Ovarian cysts saam tv
लाईफस्टाईल

Ovarian cysts: महिलांच्या छोट्या चुकांमुळे होतायत अंडाशयात गाठी; कशी घ्याल काळजी?

Understanding Ovarian Cysts: चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेक आजार महिलांच्या मागे लागतात. यामध्ये मासिक पाळी, गर्भाशय किंवा अंडाशय यांच्यासारख्या समस्याही आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

आजकाल चुकीची जीवनशैली आणि अयोग्य आहारा यामुळे अनेक आजार मागे लागतात. यामध्ये महिलांचाही समावेश होते. अशातच अंडाशय म्हणजे ओव्हरीमध्ये गाठ (सिस्ट) होणं सामान्य गोष्ट मानली जाते. ही समस्या २० ते ४० वयोगटातील महिलांमध्ये ही समस्या अधिक प्रमाणात दिसून येते.

महिलांच्या ओव्हरमध्ये बनणारी ही गाठ जीवघेणी नसते. मात्र यामुळे वेदना, अनियमित पिरीयड्स, गर्भधारणेत समस्या या तक्रारी उद्भवू शकतात. आज आपण या आर्टिकलच्या माध्यमातून जाणून घेऊया तुमच्या कोणत्या छोट्या छोट्या चुकामुळे ओव्हरीमध्ये सिस्ट निर्माण होऊ शकतात.

अनहेल्दी डाएट

आजकाल अनेक महिलांचा आहार चुकीचा असतो. जास्त तळलेले, जंक फूड, गोड पदार्थ आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खाल्ल्याने शरीरातील हार्मोनल संतुलन बिघडतं. यामुळे ओव्हरीमध्ये सिस्ट तयार होण्याची शक्यता वाढते.

मासिक पाळीकडे दुर्लक्ष

जर मासिक पाळी वेळेवर येत नसेल, जास्त वेदना होत असतील, रक्तस्त्राव होत असेल किंवा अनियमितता असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. ही लक्षणे पीसीओएस किंवा ओव्हरी सिस्टमची असू शकतात.

वजन

जास्त वजन किंवा लठ्ठपणामुळे देखील हार्मोनल असंतुलन होतं. परिणामी ज्यामुळे सिस्ट तयार होण्याची शक्यता वाढते. वजन नियंत्रणात ठेवणे खूप महत्वाचे आहे.

व्यायाम न करणं

फीट राहण्यासाठी व्यायाम हा महत्त्वाचा असतोच. यावेळी शरीर एक्टिव्ह न राहणं, दिवसभर बसून काम करणं किंवा अजिबात व्यायाम न करणं यामुळे शरीराच्या चयापचय आणि हार्मोन्सवर परिणाम होतो. ज्यामुळे ओव्हरीमध्ये सिस्ट होण्याचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो.

पुरेशी झोप घेणं

कामाच्या वाढत्या ताणामुळे रात्री अनेकांचं जागरण होतं. अशावेळी झोपेच्या कमतरतेमुळे शरीरात ताण वाढतो आणि हार्मोन्समध्ये व्यत्यय येतो. जे अंडाशयातील सिस्टचे एक प्रमुख कारण आहे. त्यामुळे दररोज किमान ७-८ तास झोप घेणं महत्वाचं आहे.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra School: पहिलीच्या वेळापत्रकातून हिंदी हद्दपार, सुधारित वेळापत्रक जाहीर

Shukrawar che Upay: शुक्रवारच्या दिवशी 'या' चमत्कारी उपायांनी नशीब उजळेल; करियर-कुटुंबातील अडखळे होतील दूर

Indore Street Food: फक्त पोहेच नाही, इंदूरची 'हे' स्ट्रीट डिशेस देखील आहेत अव्वल दर्जाचे

Maharashtra Live News Update: विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत जाऊन पोहोचली

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये

SCROLL FOR NEXT