Oukitel C35 Smartphone Saam Tv
लाईफस्टाईल

New Smartphone: जबरदस्त आहे हा फोन; 24GB RAM आणि 280 तासांची बॅटरी लाइफ, किंमत फक्त 13000 हजार

Oukitel C35 Smartphone: जबरदस्त आहे हा फोन; 24GB RAM आणि 280 तासांची बॅटरी लाइफ, किंमत फक्त 13000 हजार

Satish Kengar

Oukitel C35 Smartphone launched:

स्मार्टफोन निर्माण कंपनी Oukitel ने आपला नवीन स्मार्टफोन Oukitel C35 लॉन्च केला आहे. हा फोन दिसायला खूपच आकर्षक आहे. यामध्ये अनेक जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत. अशातच आज अनुपम या फोनच्या किंमती आणि फीचर्सबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

24 GB पर्यंत आणि मोठा डिस्प्ले

केवळ 199 ग्रॅम वजनाच्या, Oukitel C35 स्मार्टफोनची फ्रेम फक्त 9.18 मिमी स्लिम आहे. ज्यामुळे याला चांगली हॅन्ड ग्रीप मिळते. फोनमध्ये 6.56-इंचाचा HD Plus डिस्प्ले आहे, जो 720x1600 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 400 nits ब्राइटनेसला सपोर्ट करतो.

Oukitel C35 हा फोन नवीन Android 13 OS वर काम करतो. कंपनीने या फोनमध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि Unisoc Tiger T616 प्रोसेसर दिला आहे. फोन 12GB RAM (24GB पर्यंत वाढवता येऊ शकतो) पॅक करतो आणि 256GB स्टोरेज (1TB पर्यंत वाढवता येऊ शकतो) आहे. (Latest Marathi News)

नवीन Oukitel C35 स्मार्टफोन मोठ्या 5150mAh बॅटरीसह येतो. जो 280 तासांचा स्टँडबाय टाइम देतो. कंपनीचा दावा आहे की, फुल चार्जमध्ये 25 तास सतत कॉलिंग किंवा 20 तास गाणी ऐकता येतात. फोटोग्राफीसाठी, यात 50-मेगापिक्सेलच्या प्रायमरी कॅमेरासह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 8-मेगापिक्सेल कॅमेरा आहे.

किंमत

फोनची मूळ किंमत 199 डॉलर्स (अंदाजे रु. 16,500) आहे. परंतु डिस्काउंट कूपन वापरून 159.2 डॉलर्समध्ये (अंदाजे रु. 13,200) खरेदी करता येईल. याच्याअधिकृत वेबसाइटवर, कंपनी आपल्या ग्राहकांना 20% डिस्काउंट कूपन देत आहे, ज्याचा वापर करून फोनची किंमत कमी केली जाऊ शकते. हा फोन ब्लॅक, ग्रीन आणि लाइट ब्लू कलरमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raja Raghuji Bhosle Sword: वाघ नखानंतर राजांची तलवार महाराष्ट्रात येणार; लंडनमधील तलवार हस्तांतरित

Maharashtra Politics: आंबेडकर-ठाकरे एकत्र येणार? वंचितची मोठी घोषणा, पालिका निवडणुकीत नवी समीकरणं

India Population: भारताच्या लोकसंख्या वाढीला ब्रेक; मूल नको असलेल्या कुटुंबांची संख्या वाढली

Mumbai Local Accident : मुंबई लोकलच्या टपावर चढला; तरुणासोबत क्षणात होत्याचं नव्हत झालं

Superfood For Monsoon: पावसाळ्यात निरोगी आरोग्यासाठी वरदान आहेत 'हे' सूपरफूड, आजच आहारात करा समावेश

SCROLL FOR NEXT