Organ donation awareness campaign saam tv
लाईफस्टाईल

Organ donation: अवयवदान सर्वश्रेष्ठ दान…! वोक्हार्ट रूग्णालयाची अवयवदान जनजागृती मोहीम यशस्वी; ५ हजार लोकांपर्यंत पोहोचवला संदेश

Organ donation awareness campaign: अवयवदान हेच श्रेष्ठ दान आहे, हा संदेश समाजात रुजवण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून विविध माध्यमांतून एक प्रभावी जनजागृती मोहीम राबवण्यात येत होती. या मोहिमेला अभूतपूर्व यश मिळाले असून, सुमारे ५,००० लोकांपर्यंत हा महत्त्वाचा संदेश पोहोचवण्यात यश आले आहे.

Surabhi Jayashree Jagdish

मुंबई सेंट्रलच्या वॉक्हार्ट हॉस्पिटल्सने 11 जुलै ते 11 ऑगस्ट 2025 दरम्यान आयोजित महिनाभर चाललेल्या अवयवदान जनजागृती मोहिमेचा यशस्वीपणे समारोप केला. "आपली शेवटची कृती ही सर्वोत्तम ठरू शकते!" या संकल्पनेवर आधारित या उपक्रमाचा उद्देश विविध समुदाय आणि धर्मांमध्ये अवयवदानाविषयीचा संवाद अधिक खुला आणि सहज बनवणं हा होता.

या मोहिमेद्वारे हॉस्पिटलमधील विशेष कार्यक्रम, मोहिमा त्याचप्रमाणे समुदाय केंद्रांतील संवाद सत्रांमधून 5,000 पेक्षा जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यात आले. या उपक्रमात विविध धर्मांचे आध्यात्मिक नेते, अवयव प्रत्यारोपण तज्ज्ञ, तसंच दाते आणि अवयव प्राप्तकर्त्यांची कुटुंबं सहभागी झाली. वैद्यकीय गरजा आणि सामाजिक समज यांमधील दरी कमी करणे हे यामागील उद्दीष्ट होतं

झेडटीसीसी मुंबईचे अध्यक्ष डॉ. एस. के. माथुर यांनी सांगितलं की, "अवयवदान हे मानवतेतील सर्वोत्तम कार्य आहे. दरवर्षी हजारो लोक फक्त दाते कमी असल्यामुळे मृत्युमुखी पडतात. जर कुटुंबांनी आपल्या इच्छांविषयी उघडपणे चर्चा केली, तर दुःखाच्या क्षणांना आयुष्य आणि आशेची परंपरा बनवता येते."

मुंबई सेंट्रलच्या वॉक्हार्ट हॉस्पिटल्सचे लिव्हर प्रत्यारोपण आणि जीआय सर्जन डॉ. स्वप्निल शर्मा म्हणाले, "आम्ही अनेक रुग्ण गमावतो, कारण वैद्यकीय मर्यादा नसतात, पण अवयवांची कमतरता असते. लोकांनी आपल्या इच्छा अगोदरच सांगितल्या तर तर अनेक शोकांतिका नव्या संधींमध्ये बदलू शकतात."

सल्लागार नेफ्रॉलॉजिस्ट आणि मूत्रपिंड प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. निखिल भसीन यांनीही "एक दाता आठ जीव वाचवू शकतो. हे सर्व घरातील संवादातून सुरू होतं, जे कुटुंबांना आत्मविश्वासाने ‘हो’ म्हणण्यास प्रवृत्त करतं, असं म्हटलंय.

रूग्णालयाच्या या मोहिमेत डायलिसिस रुग्ण, प्रत्यारोपण प्राप्तकर्ते, समुदाय नेते आणि स्वयंसेवक यांचा सहभाग होता. मोफत आरोग्य तपासणी शिबिरं, क्यूआर कोडद्वारे तसंच प्रत्यक्ष फॉर्मद्वारे दाता नोंदणी मोहीम राबवण्यात आली. अवयवदान केलेल्या कुटुंबांना त्यांच्या जीवनरक्षक निर्णयासाठी सन्मानित करण्यात आलं, तर प्राप्तकर्त्यांनी नव्या आयुष्याच्या भावनिक कथा शेअर केल्या.

वॉक्हार्ट हॉस्पिटल्स मुंबई सेंट्रलचे सेंटर हेड डॉ. विरेंद्र चौहान यांनी सांगितले, "ही मोहीम अवयवदानाबाबत खुलेपणाची संस्कृती निर्माण करण्याच्या आमच्या बांधिलकीचं प्रतीक आहे. वैद्यकीय आणि आध्यात्मिक विचार एकत्र आणून गैरसमज दूर करणे, विश्वास निर्माण करणे आणि कृतीसाठी प्रेरित करणे हे आमचे उद्दिष्ट आहे."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : अलका टॉकीज चौकात "श्रीमंत" दाखल

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

Pune News: पुण्यात दगडूशेठ गणपतीची महाआरती पाहा VIDEO

ITR Filing : टॅक्स रिफंड परताव्याचा फॉर्म अडकून पडलाय? मग 'या' गोष्टी एकदा तपासाच

Akola Accident: गणेश विसर्जन करून परताना भक्तांवर काळाचा घाला; तरुणाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT