Optical illusion, Viral news
Optical illusion, Viral news Photo credit : Twitter
लाईफस्टाईल

Optical illusion : या चित्रात दडले आहेत ४ प्राणी, त्यावरुन समजेल आपल्याला आपले व्यक्तिमत्त्व

कोमल दामुद्रे

मुंबई : सध्या वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्टिकल इल्युजन आपण इंटरनेट किंवा आपल्या फोनमध्ये पाहत असतो. त्या चित्रातून आपल्याला काही तरी शोधायला सांगितले जाते.

हे देखील पहा -

आपली बुध्दीमता चाचणी वाढवण्यासाठी आपण नवनवीन पझल गेम, सूडको किंवा पेपरात येणाऱ्या व्यक्तिमत्त्व चाचणीतील प्रश्नांची उत्तरे देत असतो. या चित्रात आपण कोणत्या प्राण्याला पाहातो त्यावर आपले व्यक्तिमत्त्व स्पष्ट करणारे ऑप्टिकल इल्युजन आहे. ज्याप्रमाणे आपण या ऑप्टिकल इल्युजनला पाहण्याचा प्रयत्न करु त्याप्रमाणे त्याचे वेगळेपण आपल्याला भासेल.

या फोटोला पाहताना त्याचे काळजीपूर्वक निरीक्षण करा. पहिल्यांदा पाहताना आपल्याला काय लक्षात येईल हे देखील पहा. यात लपलेल्या प्राण्याचे व्यक्तिमत्त्व आपल्याला आधीपासून माहित असेल त्यानुसार आपल्याला आपले व्यक्तिमत्त्व कळेल.

१. या ऑप्टिकल इल्युजनच्या खालच्या डाव्या बाजूला अर्ध्या भागात एक नकारात्मक जागेत गोरीला दिसेल. पाहताच क्षणी जर आपल्याला गोरीला दिसला तर आपली निरक्षण शक्ती ही उत्तम आहे असे म्हण्यात काही वावग ठरणार नाही. तसेच आपल्याला एखादी समस्या सोडवण्याआधी त्याविषयी पुरेशी माहिती असणे गरजेचे आहे त्याबाबत आपण अधिक जागरुक आहोत असे विश्लेषणात्मक विचार आपले असतील.

२. झाडावर उडणाऱ्या दोन पक्ष्यांच्या रुपरेषाभोवती आपली नजर केंद्रित केली आणि आपल्याला ते पाहताच क्षणी दिसेल तर, आपण एक प्रामाणिक व्यक्ती असू शकतो. ही व्यक्ती सर्वांना आरामात ठेवण्याचे काम करेल. तसेच अंतर्ज्ञान आणि लोक कौशल्यामुळे आपण एक प्रभावी नेता बनू शकतो.

३. झाडाच्या (Tree) उजव्या बाजूला सिंह आपल्या दिसत आहे परंतु, आपण भ्रमात आहोत की, तो सिंह आहे की मांजर. सिंहाऐवजी पहिल्यांदा आपल्याला मांजर दिसल्यास आपण प्रबळ व्यक्ती आहोत. आपल्याला नेहमी पुढे जाण्याची व प्रयत्न करण्याची इच्छा असते. कधीकधी आपण इतरांना पुढे जाण्यास मदत करतो. हा स्वभाव आपल्याला दिसेल.

४. या चित्राच्या (Photo) तळाशी पाहिल्यास आपल्याला झेप घेणारा मासा दिसेल. जर आपण तो सर्वप्रथम पाहिला असेल तर आपला स्वभाव हा आदर्शवाद व दयाळूपणाचा असेल परंतु, आपल्या जवळपासच्या लोकांना आपल्यावर अवलंबून राहायला आवडते.

ऑप्टिकल इल्युजनमध्ये हे आपल्या डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी तयार केलेल चित्र आहे, जे आपल्या अभ्यासासाठी महत्त्वाचे साधन आहे. हे आपल्या मेंदूतील मज्जासंस्थेच्या प्रक्रियेला चालना देतात ज्यामुळे आपल्याला सभोवतालचे जग पाहता येते असे संशोधक आणि मानवी धारणा तज्ञ, डॉ. गुस्ताव कुहन यांनी द सनला सांगितले आहे.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar Water Shortage : नंदुरबार शहरावर पाणी कपातीची टांगती तलवार; विरचक धरणातील पाणीसाठा घटला

Today's Marathi News Live : सांगलीत कॉफी शॉप तोडफोड प्रकरणी १६ जण ताब्यात

Swati Maliwal Assault Case: स्वाती मालीवाल मारहाण प्रकरण, संशयित आरोपी बिभव कुमार घरातून गायब

Wedding Viral Video: बापरे! भर मंडपात नवरा-नवरीची हाणामारी; VIDEO होतोय व्हायरल

Jamner Crime : नशेत मुलाने केला पित्याचा खून; दारूसाठी पैसे देण्यास वडिलांनी नकार दिल्याने कृत्य

SCROLL FOR NEXT