OPPO A38 launched in India Saam Tv
लाईफस्टाईल

New Smartphone Launch: 50MP चा जबरदस्त कॅमेरा, 5000mAh ची दमदार बॅटरी; Oppo A38 भारतात लॉन्च

OPPO A38 Launched in India: 50MP चा जबरदस्त कॅमेरा, 5000mAh ची दमदार बॅटरी; Oppo A38 भारतात लॉन्च

Satish Kengar

OPPO A38: Price, Specification

Oppo ने भारतीय बाजारात Oppo A38 हा नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा फोन कंपनीच्या बजेट सीरीजचा एक भाग आहे. यामध्ये तुम्हाला 6.56-इंचाची मोठी स्क्रीन, ड्युअल रियर कॅमेरा आणि मजबूत बॅटरी सारखे फीचर्स मिळतात. काही दिवसांपूर्वीच कंपनीने हा फोन UAE मध्ये सादर केला होता.

कंपनीने Oppo A38 दोन कलर व्हेरियंटमध्ये लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. कंपनीने हा स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...

Oppo A38 किंमत

Oppo ने हा स्मार्टफोन ग्लोइंग ब्लॅक आणि ग्लोइंग गोल्ड कलर मध्ये लॉन्च केला आहे. स्मार्टफोन फक्त एका कॉन्फिगरेशनमध्ये 4GB RAM + 128GB स्टोरेजमध्ये येतो. Oppo A38 चा हा प्रकार 12,999 रुपयांना येतो. तुम्ही हा हँडसेट प्री-ऑर्डर करू शकता. हा फोन 13 सप्टेंबरला फ्लिपकार्ट आणि ओप्पोच्या अधिकृत वेबसाइटवर विक्रीसाठी जाईल. (Latest Marathi News)

स्पेसिफिकेशन

Oppo A38 मध्ये 6.56-इंचाचा HD+ LCD डिस्प्ले आहे. स्क्रीन 90Hz रिफ्रेश रेट आणि 720 Nits पीक ब्राइटनेससह येते. ड्युअल सिम सपोर्ट असलेला हा स्मार्टफोन Android 13 वर आधारित Color OS 13.1 वर काम करेल. यामध्ये Octacore MediaTek Helio G85 प्रोसेसर वापरण्यात आला आहे.

हा डिव्हाइस 4GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह येतो. यात ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्याची प्रायमरी लेन्स 50MP आहे. दुसरी लेन्स 2MP ची आहे. फ्रंटमध्ये कंपनीने 5MP सेल्फी कॅमेरा दिला आहे. डिव्हाइसला पॉवर देण्यासाठी 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. जी 33W SuperVOOC चार्जिंगला सपोर्ट करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahadev Temple: शिवमंदिरात महिलांनी केव्हा जावे? जाणून घ्या योग्य वेळ

Valheri Waterfall: मुसळधार पावसामुळे वाल्हेरी धबधब्याचे सौंदर्य खुलले; पर्यटकांची प्रचंड गर्दी| VIDEO

Muharram : मोहरमच्या आनंदावर विरजण, आगीत हनुमंतचा मृत्यू; काळजात धस्स करणारी घटना

GK: टोमॅटो अन् बटाटापेक्षा स्वस्त काजू! जाणून घ्या भारतातील 'हे' अनोखे ठिकाण

Pimpri Chinchwad : हिंजवडीच्या पुरस्थितीनंतर पीएमआरडीएचे कठोर पाऊल; चार जणांवर केला गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT