Online Fraud Alert  Saam Tv
लाईफस्टाईल

Online Fraud Alert : सावधान ! ऑनलाईन पेमेंट करताय ? बळी पडू शकता फसवणूकीला, या स्टेप्सने खाते करा अधिक सुरक्षित

Online Transaction Safety : ऑनलाईन बँकिंगचा उपयोग करत असाल तर, तुम्हाला तुमचे ऑनलाईन बँकिंग सुरक्षित करणे आवश्यक आहे.

कोमल दामुद्रे

Online Banking Security : पूर्वीच्या बँकेच्या व्यवहारात आणि आताच्या बँकेच्या व्यवहारात खूप बदल झालेला पाहायला मिळतो. पूर्वी बँकेचे काम करायचे झाल्यास सारख्या फेऱ्या माराव्या लागायच्या परंतु आता पैसे पाठवायचे असतील, आपला बँक बॅलेन्स तपासायचा असेल, एटीएम कार्ड ऑर्डर करायचे असेल, एवढेच काय तर कर्ज घ्यायचा अर्ज देखील आपण ऑनलाईन पद्धतीने करू शकतो.

तुम्ही देखील जर ऑनलाईन (online) बँकिंगचा उपयोग करत असाल तर, तुम्हाला तुमचे ऑनलाईन बँकिंग सुरक्षित करणे आवश्यक आहे. अन्यथा तुम्ही देखील ऑनलाईन बँकिंग फसवणुकीचे शिकार होऊ शकता. ज्यामुळे तुम्हाला मोठ्या आर्थिक (Money) नुकसानाला सामोरे जावे लागू शकते. कसे कराल आपले ऑनलाईन बँकिंग खाते सुरक्षित जाणून घ्या सविस्तर.

ऑनलाइन बँकिंग सुरक्षित करण्याचे उपायः

1. पासवर्ड

तुम्ही नेहमी आपल्या ऑनलाईन बँकिंगचा (Bank) पासवर्ड मजबूत ठेवला पाहिजे. कधीही "१२३४५६७८" सारखा साधा सोपा पासवर्ड ठेवू नये. तसेच पासवर्डमध्ये आपले नाव "SURESH" ठेवू नये. याउलट तुम्ही "UPPWLS$#!83571@@।" अशा प्रकारचा कठीण पासवर्ड ठेऊ शकता.

2. प्रत्येक ठिकाणी लॉगिन करणे टाळावे

आपले ऑनलाईन बँकिंगचे लॉगिन दुसऱ्याच्या मोबाइलमध्ये किंवा सिस्टममध्ये चुकूनही करू नये. आपले ऑनलाईन बँकिंग आपल्याच सुरक्षित मोबाइलमध्ये लॉगिन असेल या गोष्टीची विशेष खबरदारी बाळगावी.

3. आपल्या ब्राउजरवर आयडी-पासवर्ड सेव्ह करू नये

अनेकदा काही लोक त्यांचे ऑनलाईन बँकिंग एखाद्या ब्राउजर वर लॉग इन करतात तेव्हा त्यांचा पासवर्ड ब्राउजर वर सेव करतात, जेणेकरून त्यांना पुन्हा लॉग इन करताना पासवर्ड टाइप करावा लागणार नाही. परंतु असे केल्याने तुमचे नेट बँकिंग धोक्यात येऊ शकते.

4. थर्ड पार्टी अॅप्स कधीहा वापरू नये

जर तुम्हाला तुमच्या नेट बँकिंगचा वापर एखाद्या अॅपद्वारे मोबाइलमध्ये करायचा असेल तर कधी ही थर्ड पार्टी अॅपचा वापर करू नये. असे केल्यास तुम्हाला फसवणुकीला सामोरे जावे लागेल. त्यामुळे नेहमीच आपल्या बँकेच्या अधिकृत अॅपचाच वापर करावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT