कोमल दामुद्रे
भारतामध्ये तांदळाकडे मुख्य अन्न म्हणून पाहिलं जातं, भारतीयांच्या आहारात मोठ्या प्रमाणात तांदळाचा वापर होतो.
मात्र अनेकदा तांदळाची खरेदी करताना आपली फसवणूक देखील होऊ शकते.
मात्र सध्या बाजारात प्लास्टिकचे तांदूळ देखील आले आहेत. अशा प्रकारचे पांढरेशुभ्र आणि कृत्रिम असलेले हे तांदूळ अनेक आजारांना निमंत्रण देऊ शकतात.
अशा प्रकारचे तांदूळ अनेकदा बासमती तांदूळ म्हणून बाजारात विकले जातात.
बासमती तांदळाचा दाणा हा लांब असतो. जेव्हा भात शिजवला जातो तेव्हा हे दाणे एकोंमेकांना न चिटकता भात तयार होतो
या भातामधून एक प्रकारचा सुगंध येतो. या सुंगाधामुळे बासमती तांदळाची ओळख होते.
तांदळाचे काही दाणे एका चमच्यामध्ये घ्या आणि ते पाण्यानं भरलेल्या वाटीमध्ये टाका.
जर तांदळाचे दाणे खाली जावून बसले तर तो ओरिजनल तांदूळ आहे असे समजावे.
एका तव्यावर थोडा तांदूळ घ्या तो गरम करा ते दाणे जर एकोमेंकांना चिकटले तर समजून जा की हा प्लास्टिकचा तांदूळ आहे.