high blood pressure 
लाईफस्टाईल

High Blood Pressure: BP वाढायला 'या' ४ चूका ठरतात कारणभूत, डॉक्टरांनी दिलाय महत्त्वाचा सल्ला

Hypertension Risk: ऑनलाइन जंक फूड खाण्यामुळे वाढणारा बीपी आणि त्याचे दुष्परिणाम जाणून घ्या. योग्य आहार, व्यायाम आणि जीवनशैली बदल करून उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याचे सोपे उपाय समजून घ्या.

Sakshi Sunil Jadhav

ऑनलाइन जंक फूडचा शरीरावर होणारा परिणाम

आहारातले महत्वाचे बदल

महत्वाच्या सवयींमधील बदल

सध्या ऑनलाइन फूड ऑर्डर करणं हा तरुणांचा एक ट्रेंडच सुरु आहे. कमी किमतीत, ऑफर्समध्ये तुम्हाला अनेक जंक फूड खायला मिळत असतील. पण यासगळ्याचा परिणाम तुमच्या शरीराला होतो. तुमचे पैसे ऑनलाइन ऑफर्समुळे वाचत असले तरी तुमच्या आजारापणावर त्याचा दुप्पट परिणाम होतो.

कारण काही आजार हे असे आहेत की, तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष केलंत तुम्हाला अर्ध्याआयुष्यात काही गंभीर किंवा जीवघेण्या आजारांना सामोरं जावं लागू शकतं. यापासून लांब राहण्यासाठी तुम्हाला तुमच्या रोजच्या जीवनशैलीत काही बदल करुन पाहणं गरजेचं आहे. पुढील माहितीत आपण रक्तदाबाच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी कोणते महत्वाचे बदल करणं गरजेचं आहे? याबद्दल जाणून घेणार आहोत.

डॉक्टर म्हणतात, तुम्ही जर Hypertension या समस्येवर जर उपचार केले नाहीत, तर तुम्हाला ह्रदयविकार, स्ट्रोक आणि इतर गंभीर आजारांचा धोका निर्माण होतो. सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही जेवणात भाज्या, फळं, धान्ये आणि कमी फॅटचे प्रोटीन या महत्वाचा अन्नाचा समावेश करा.

तुम्ही यासोबत पोटॅशियमने समृद्ध असलेले पदार्थ जसं केळी, पालक, अवोकॅडो आणि कडधान्ये रोजच्या आहारात घ्या. याने शरीरातलं सोडियम बाहेर पडतं आणि रक्तवाहिन्या रिलॅक्स होतात. म्हणजेच तुमचा BP नियंत्रणात राहतो.

तुम्ही जमेल तितका व्यायाम करु शकता. पुरेशी झोप घ्या. चालणे, सायकलिंग, पोहणे यांसारखे एरोबिक व्यायाम आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग यांचा समावेश रोजच्या दिवसात करा. याने तुम्हाला आठवड्याभरातच बीपीच्या रिडींगमध्ये बदल होताना जाणवेल.

Disclaimer: ही माहिती सामान्य स्वरूपाची असून वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. कोणत्याही उपचारासाठी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उरळी कांचन येथे लक्ष्मण हाके यांच्या मोर्चामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी

Krishna Janmashtami 2026: यंदाच्या जन्माष्टमीला द्वापार युगासारखा दुर्मिळ महासंयोग! ४ राशींचं उजळणार भाग्य

Mangalsutra Designs: नवरा- बायकोच्या नावाचं मंगळसूत्र, या 5 डिझाईन्स पाहून प्रेमात पडाल

Thyroid Health : तुमचंही वजन विनाकारण वाढतंय? 'या' ५ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असू शकतो थायरॉईड

Global Warming : मुंबई जगाच्या नकाशावरून गायब होणार? UN च्या अहवालात भारताला भयानक इशारा; पुढील काही वर्षांत काय घडणार?

SCROLL FOR NEXT