Sakshi Sunil Jadhav
jio नेहमीच त्यांच्या ग्राहकांसाठी नवीन रिचार्ज प्लान सादर करत असतं. त्यामध्ये फक्त रिचार्जच नाही, तर इतर सुविधांचाही समावेश असतो.
पुढील प्लानमध्ये तुम्हाला ३४९ पेक्षा कमी किमतीत महिन्याभराचा रिचार्जप्लान मिळणार आहे.
आधीच्या Jioच्या रिचार्ज प्लानमध्ये २८ दिवसांची वैधता आणि १.५ जीबी डेटा मिळत होता. आता यात काही बदल केले आहेत.
Jioच्या नव्या रिचार्जची किंमत ही ३३९ रुपये आहे. जी तुलनेने आधीच्या प्लानपेक्षा थोडी वेगळी असेल.
तुम्हाला यामध्ये २८ नाही तर संपूर्ण महिन्याची वैधता असणार आहे. त्यामुळे हा प्लान सगळ्यांनाच परवडेल. यात आणखी खासियत आहे.
तुम्हाला यामध्ये दिवसाला १०० एसएमएसची सुविधा मिळणार आहे. त्यामुळे महत्वाच्या वेळी तुम्ही टेक्स मेसेजचा वापर करु शकता.
तुम्ही जर हा रिचार्ज दर महिन्याला केलात तर वर्षाला १३ ऐवजी १२ च महिने रिचार्ज करावा लागेल.
तुम्हाला यामध्ये अनलिमिडेट कॉलचीही सुविधा असते. यासोबत गुगल जेमिनीचा प्रोचे सब्सक्रिप्शन मिळतं. याचा कालावधी १८ महिन्यांचा असतो. जितक्या दिवसांचा महिना असतो तितके दिवस तुम्हाला यामध्ये रिचार्ज मिळतो.