OnePlus Pad Go Sale  Saam Tv
लाईफस्टाईल

OnePlus Pad Go सेल सुरू, 8000mAh बॅटरीसह दमदार फीचर्स! मिळवा हजारोंचा डिस्काउंट

Shraddha Thik

OnePlus Pad Go ची पहिली विक्री आज 20 ऑक्टोबर रोजी सुरू झाली आहे. कंपनीने नुकताच आपला स्वस्त टॅबलेट लाँच केला आहे. ब्रँडने याला 2.4K रिझोल्यूशन 8000mAh बॅटरी आणि दमदार प्रोसेसरसह डिस्प्ले दिला आहे. त्याच्या किंमतीच्या श्रेणीत येणारा हा सर्वात आकर्षक टॅब्लेट आहे.

आजपासून तुम्ही हा टॅबलेट खरेदी करू शकता. कंपनीच्या अधिकृत साइट व्यतिरिक्त हा डिवाइस Amazon आणि Flipkart वर देखील उपलब्ध असेल. चला तर मग त्याची किंमत आणि पहिल्या सेलमध्ये उपलब्ध असलेल्या ऑफरचे (Offer) तपशील पाहूयात.

OnePlus Pad Go ची किंमत

कंपनीने हा डिवाइस तीन कॉन्फिगरेशनमध्ये लॉन्च केला आहे. त्याचा 8GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिएंट 19,999 रुपयांना लॉन्च करण्यात आला आहे. ही किंमत वाय-फाय व्हेरियंटसाठी आहे. तर त्याच्या LTE वेरिएंटची किंमत 21,999 रुपये आहे. आता 8GB RAM + 256GB स्टोरेजबद्दल बोलायचे झाले तर, त्याच्या LTE व्हेरिएंटची किंमत 23,999 रुपये आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यामध्ये तुम्हाला फक्त वाय-फायचा पर्याय मिळत नाही. यावर डिस्काउंट ऑफर्सही उपलब्ध आहेत. ICICI बँक क्रेडिट कार्ड आणि EMI पर्याय वापरून तुम्ही 2000 रुपयांची झटपट सूट मिळवू शकता. एका कार्डवर 2000 रुपयांची बँक (Bank) ऑफर देखील उपलब्ध आहे.

वैशिष्ट्य काय आहेत?

OnePlus चा नवीन टॅबलेट (Tablet) Android 13 वर आधारित Oxygen OS 13.2 वर काम करतो. यात 2.4K रिझोल्यूशनसह 11.35-इंचाचा एलसीडी डिस्प्ले आहे. ही स्क्रीन 90Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येते. OnePlus Pad Go टॅबलेट MediaTek Helio G99 प्रोसेसरवर काम करतो.

यात 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजचा पर्याय आहे. डिव्हाइस 8MP मागील कॅमेरा आणि 8MP फ्रंट कॅमेरासह येतो. डिव्हाइसला उर्जा देण्यासाठी, 8000mAh बॅटरी प्रदान केली गेली आहे, जी 33W Supervooc चार्जिंगला सपोर्ट करते. यामध्ये तुम्हाला एलटीई आणि वायफाय दोन्ही पर्याय मिळतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT