OnePlus Nord Launch Saam tv
लाईफस्टाईल

OnePlus Nord Launch: OnePlus Nord CE3 5G लॉन्च ! मिळतोय Snapdragon 782 प्रोसेसर व 5000mAh बॅटरीसह, जाणून घ्या किंमत

कोमल दामुद्रे

OnePlus Nord CE3 5G Price : OnePlus Nord CE3 5G फोन भारतात नुकताच लॉन्च झाला आहे. कंपनीने ५ जुलैला भारतात Nord 3 5G आणि Nord CE 3 5G या दोन नवीन सिरीज बाजारात आणल्या आहेत.

यासोबतच कंपनीने नॉर्डचे वायरलेस बड्स Nord Buds 2r देखील भारतीय बाजारात लॉन्च केले आहेत. आज आम्ही तुम्हाला OnePlus Nord CE 3 5G स्‍मार्टफोनची किंमत व इतर फीचर्सबद्दल सांगणार आहोत.

1. OnePlus Nord CE 3 5G किंमत (Price)

OnePlus Nord CE 3 5G स्मार्टफोन भारतात 2 प्रकारांमध्ये लॉन्च (Launch) करण्यात आला आहे. 8GB रॅम + 128GB स्टोरेज सह फोनचा बेस व्हेरिएंट 26,999 रुपये किमतीत मिळत आहे. यासोबतच 12GB रॅम + 256GB स्टोरेज असलेला फोनचा दुसरा व्हेरिएंट 28,999 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.

2. OnePlus Nord CE 3 5G ऑफर (Offer)

हा OnePlus फोन दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. कंपनीच्या वेबसाइट् व अॅमेझॉनवर जुलैपासून विक्रीसाठी सुरु होणार आहे. ऑफसबद्दल बोलायचे झाले तर ICICI आणि SBI बँकेच्या ग्राहकांना 10 टक्के सूट मिळेल.

3. OnePlus Nord CE 3 5G चे तपशील

  • 6.7-इंच FHD+ AMOLED डिस्प्ले (120Hz रिफ्रेश रेट)

  • क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 782 प्रोसेसर

  • 50MP ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप

  • Oxygen OS 13.1 Android 13 वर आधारित

  • 5000mAh बॅटरी (80W फास्ट चार्जिंग)

4. OnePlus Nord CE 3 5G चे वैशिष्ट्ये

OnePlus Nord CE 3 5G च्या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.7-इंचाचा FHD + AMOLED डिस्प्ले आहे. डिस्प्लेचा ब्राइटनेस 950Nits आहे. वनप्लसच्या या फोनमध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 782 प्रोसेसर देण्यात आला आहे. यामध्ये स्मूद गेमिंग आणि उत्कृष्ट इमेज प्रोसेसिंग ऑफर करते. फोनमध्ये ग्राफिक्स सपोर्टसाठी Adreno 642L GPU देण्यात आला आहे. हा फोन 8GB, 12GB रॅम आणि 128GB, 256 GB स्टोरेज पर्यायामध्ये लॉन्च करण्यात आला आहे.

5. कॅमेरा

या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये कॅमेरा 50MP Sony IMX890 सेन्सर आहे. हे ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन सपोर्टसह येते. कॅमेरासोबत 8MP वाइड अँगल लेन्स आणि 2MP मॅक्रो सेन्सर प्रदान करण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16 एमपी फ्रंट कॅमेरा आहे.

6. बॅटरी

OnePlus च्या या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन 80W Supervooc चार्जला सपोर्ट करतो. यामध्ये तुम्हाला चार्जरदेखील मिळणार आहे. हा फोन Android 13 OS वर आधारित OxygenOS 13.1 वर चालतो. कनेक्टिव्हिटी फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर यात 5G SA/NSA, Dual 4G VoLTE, Wi-Fi 6, ब्लूटूथ 5.3, GPS, NFC आणि USB टाइप-सी पोर्ट आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT