OnePlus 12 yandex
लाईफस्टाईल

OnePlus 12 करेल कमी आयफोनचं मार्केट; ख्रिसमस आधी OnePlus 12 घेऊन करा टशन, जाणून घ्या मोबाईल फोनचे सर्व फिचर्स

OnePlus 12 : कंपनी आपल्या १० व्या वर्धापनदिनानिमित्त नवीन स्मार्टफोन बाजारात आणणार आहे. या स्मार्टफोनचा कॅमेरा सर्वात भारी आहे. पावर बॅकअपसाठी सुद्धा हा फोन भारी असणार आहे.

Bharat Jadhav

OnePlus 12 Features:

दिवाळीमध्ये अनेकांना आपल्या बजेटमधील मोबाईल फोन घेता आला नाही. यामुळे अनेकांची दिवाळी जरा नाराजीत गेली असेल. परंतु ख्रिसमस मात्र आनंदाचा जाणार आहे, कारण ४ डिसेंबर रोजी वनप्लसचा नवा फोन लॉन्च केला जाणार आहे. हा फोन आयफोनचं मार्केट कमी करेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. (Latest News)

वनप्लस कंपनी आपल्या १० व्या वर्धापनदिनानिमित्त नवीन स्मार्टफोन बाजारात आणणार आहे. स्मार्टफोन लॉन्च होण्याआधीच या मोबाईलचे फिचर्स ऑनलाइन लीक झाले आहेत. वनप्लस कंपनी आपला नवीन स्मार्टफोन वनप्लस १२ साठी ६.८२ इंचाची X१ ओरिएंटल LTPO OLED पॅनल देणार आहे. या फोनची स्क्रीन १४४० ×३१६८ पिक्सेल रिजोल्यूशसह देण्यात आलंय. यात २६०० मिनीटापर्यंतची ब्राइटनेस मिळते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वनप्लस १२ हा फोन पावरफूल हार्डवेअरवाला एक हाय-एंड डिवाइस असू शकतो. या डिवाइसला बेंचमार्कमध्ये नव्या Qualcomm Snapdragon 8 Gen 3 चिपसेट पाहण्यात आले होते. हे चिपसेट सर्वोत्तम असून ते अॅपलच्या १७Pro SoCच्या सारखे आहे. दरम्यान या मोबाईलमध्ये १६ जीबी पर्यंतची रॅम आणि १ टीबी युएफएस ४.० स्टोरेजची क्षमता देण्यात आलीय. दरम्यान कंपनीकडून याविषयी कोणतीही माहिती देण्यात आली नाहीये.

या स्मार्टफोनचा कॅमेरा सर्वात भारी आहे. या फोनच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेराचा सेटअप मिळतो. तर मोबाइलच्या समोरील बाजूस देण्यात आलेला कॅमेरा हा ३२ मेगापिक्सेलचा देण्यात येणार आहे. या फोनमध्ये ४८ मेगापिक्सेल सोनी आयएमएक्स ५८१ अल्ट्रा-वाइड युनिट आणि ६४ मेगापिक्सेल ओम्बिविजन ओव्ही ६४ बी टेलीफोटो देण्यात येणार आहे.

वनप्लसच्या या फोनमध्ये ५४० mAhची बॅटरी देण्यात आलीय, जे वनप्लसच्या ११ पेक्षा अधिकची पावर असणार आहे. या फोन चार्जविषयी म्हणाल तर कॉडसोबत चार्ज करण्यासाठी १०० डब्ल्यू पावर मिळते तर वायरलेसने चार्जिंग केल्यास ५० डब्ल्यूची पावर मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

Anant Chaturdashi 2025 live updates : गणपती विसर्जन मिरवणुकीत मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांसोबत ठेका धरला

Ganesh Visarjan 2025: आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच 'गणेश' गिरणा पात्रात बुडाला, गणेश विसर्जनावेळी राज्यभरातील ५ ठिकाणी विपरित घडलं, १० जण बुडाले

SCROLL FOR NEXT