वनप्लस १२ दोन महिन्यांपूर्वी लाँच झाला. बाजारात या स्मार्टफोनची खूप मागणी आहे. या फोनची बेसिक व्हेरिएंटची किंमत ६४,९९९ रुपये आहे. तर हायएन्ड व्हेरिएन्टची किंमत ६९,९९९ रुपये आहे. तुम्हाला हा मोबाईल खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. या मोबाईलविषयी जाणून घेऊयात.
प्लिपकार्टवर या फोन खरेदीवर १ टक्क्यांची सूट आहे. फ्लिपकार्टवर या फोनची किंमत ६४,०९९ रुपये आहे. या व्यतिरिक्त HDFC Bank credit bank युजर्स ईएमआयच्या मार्फत तुम्ही २,५०० रुपये वाचवू शकता. तसेच १२ महिन्यांच्या EMI वर फोन खरेदीवर अधिक ३५०० रुपयांची ऑफर मिळत आहे. या डिस्काऊंट ऑफरमार्फत तुम्ही ६०५६६ रुपयांमध्ये खरेदी करू शकतात.
वनप्लस १२ मध्ये ६.८२ इंच डिस्प्ले मिळत आहे. फोनचा रिफ्रेश रेट १२०HZ आहे. तसेच वनप्लस १२ मध्ये स्मूथ डिस्प्ले मिळत आहे. फोन फ्लोई एमराल्ड आणि सिल्की ब्लॅक रंगात हा मोबाईल मिळतो. सॉफ्टवेयरच्या मार्फत फोनमध्ये OxygenOS आणि आऊट ऑफ बॉक्स Android 14 वर चालतो. फोन स्नॅपड्रॅगन ८ जेन ३ प्रोसेसर पेक्षा कमी आहे.
बॅटरीविषयी बोलायचे झालं तर फोनमध्ये ५४०० 'एमएएच'ची मोठी बॅटरी मिळते. कंपनीचा दावा आहे की, सिंगल चार्जवर पूर्ण दिवस मोबाईल वापरू शकता. या व्यतिरिक्त बॅटरी १००w supervooc आणि 50w AIRVOC फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. या फोनला मिनिटांत चार्जिंग होते. वायब्रेशन फीडबॅकसाठी फोनमध्ये हॅप्टिंक मोटर आणि जेस्चर, ऑन-स्क्रिन नेव्हिगेशन सपोर्ट, अलर्ट स्लाइडर, पॉवर बटन आणि व्हॉल्यूम बटन देखील मिळत आहे.
कॅमेराच्या बाबतीत वनप्लस १२ हा फोन जबरदस्त आहे. फोनमध्ये हॅसलब्लेड कॅमेरा आहे. नाइटस्कॅप आणि पोर्टेट मोड सारखे फिचर्स मिळत आहे. फोनमध्ये ५० मेगापिक्सल प्रायमरी कॅमरा, ४८ मेगापिक्सल वाइड कॅमेरा, ३* ऑप्टिकल झूमसोबत ६४ मेगापिक्सल टेलीफोटो कॅमेरा, ४८ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि ३२ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देखील आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.