Garuda Purana Secret saam tv
लाईफस्टाईल

Garuda Purana Secret: मृत्यूपूर्वी १ तास अगोदर व्यक्तीला दिसतात 'या' गोष्टी; गरूड पुराणात केलाय उल्लेख

Garuda Purana Secret: शास्त्रानुसार, आत्म्याला त्याच्या कर्मानुसार कोणतं फळ भोगावं लागतं. गरूण पुराणात, मृत्यूनंतर आत्म्याचं काय होतं तसंच आत्म्याला कोणता आणि कसा प्रवास करावा लागतो, याबाबत सांगण्यात आलं आहे.

Surabhi Jayashree Jagdish

जो व्यक्ती पृथ्वीवर जन्म घेतो, त्याच्या मृत्यू देखील होतो. गरुड पुराणात जन्म आणि मृत्यूबद्दल अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. हिंदू धर्मग्रंथांमध्ये एकूण अठरा पुराणांचा उल्लेख आहे. गरूण पुराण एक असा ग्रंथ आहे, ज्यामध्ये मृत्यूपूर्वी आणि मृत्यूच्या वेळी घडलेल्या रहस्यांबद्दल सांगण्यात आलं आहे. मृत्यूनंतर आत्म्याचं काय होतं तसंच आत्म्याला कोणता आणि कसा प्रवास करावा लागतो, याबाबतही सांगण्यात आलं आहे.

शास्त्रानुसार, आत्म्याला त्याच्या कर्मानुसार कोणतं फळ भोगावं लागतं. मात्र त्याच वेळी, मृत्यूपूर्वी शरीराचं म्हणजेच देहाचं काय होतं आणि मृत्यूनंतर आत्मा कोठे राहतो हे देखील नमूद करण्यात आलं आहे.

मृत्यूच्या वेळी होतात पूर्वजांचं दर्शन

गरुड पुराणात असं नमूद करण्यात आलंय की, मृत्यूपूर्वी व्यक्तीला त्याच्या पितरांचं दर्शन होते. ज्यावेळी एखाद्या व्यक्तीचं जीवन संपतं म्हणजेच ती व्यक्ती शेवटचा श्वास घेते तेव्हा त्याचे पूर्वज दिसू लागतात. यावेळी त्या व्यक्तीला असं वाटतं की, ते त्याला स्वतःकडे बोलावतायत.

व्यक्तीला आठवू लागतात जुन्या गोष्टी

गरुड पुराणानुसार, एखाद्या व्यक्तीला त्याच्या मृत्यूच्या काही काळ आधी त्याने त्याच्या आयुष्यात केलेली कामं डोळ्यासमोर दिसू लागतात. गरुड पुराणात असं म्हटलंय की, ज्यावेळी एखादी व्यक्ती शेवटचा श्वास घेते तेव्हा तो त्याच्या कर्माने स्वतःचा न्याय करतो. आयुष्यात केलेल्या कामांच्या या मूल्यांकनाशिवाय माणूस मरत नाही, असंही म्हटलं जातं.

गरुड पुराणात काय नमूद करण्यात आलंय?

ज्यावेळी एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याला एक रहस्यमय दरवाजा दिसतो. काही लोकांना त्या दरवाजातून पांढऱ्या प्रकाशाची किरणं दिसू शकतात, असं गरूड पुराणात म्हटलं आहे. तर काहींना या दरवाजातून आगीचे लोट दिसू शकतात. असं मानलं जातं की, दारातून बाहेर पडणारा प्रकाश किंवा आग हे व्यक्तीच्या भूतकाळातील कर्माचं प्रतिनिधित्व करतात.

शेवटच्या क्षणी व्यक्तीला काय दिसतं?

गरूड पुराणानुसार, ज्यावेळी व्यक्तीचा मृत्यू जवळ असतो किंवा त्याचे शेवटचे क्षण असतात, तेव्हा त्याला यमदूत दिसू लागतो. अशावेळी व्यक्तींना आपल्या आजू-बाजूला यमदूत असल्यासारखं वाटतं.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party: खराडीतील रेव्ह पार्टीपूर्वी आरोपींची आणखी २ ठिकाणी पार्टी, तपासातून धक्कादायक माहिती उघड

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सोलापुरात पार पडलं महाआरोग्य शिबीर

पावसात लहानग्यांचे आरोग्य जपण्यासाठी घ्या 'ही' खबरदारी

Shirur News : शेतकरी दाम्पत्याची दोन एकर शेती सातबारावरून गायब; तलाठी व मंडळ अधिकाऱ्याचा प्रताप

Pune : ट्युशनमध्ये मुलाला बेल्ट अन् वह्यांनी बेदम मारहाण, ३५ वर्षाच्या शिक्षिकेवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT