मुंबईकरांची चिंता वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. मुंबईत हार्ट अटॅकने दररोज 27 जणांचा म्हणजे मृत्यू होत असल्याचं समोर आलंय. याचाच अर्थ दर 55 मिनिटांनी एकाचा मृत्यू होतोय. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या 2023च्या अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. एकूण मृतांमध्ये 11% मृत्यू हार्ट अटॅकनं होत आहेत. धक्कादायक म्हणजे 40 वयोगटातील तरुणांमध्ये हार्ट अटॅकचं सर्वाधिक प्रमाण आहे
सध्या चुकीची जीवनशैली आणि अयोग्य आहार यामुळे अनेक आजार मागे लागतात. यामध्ये मधुमेह, कोलेस्ट्रॉल तसंच हृदयाच्या समस्या यांचा समावेश आहे. मात्र मुंबईकरांच्या आरोग्य गेल्या काही काळात अजूनच धोक्यात आल्याचं दिसून येतंय.
रविवारी जागतिक हृदय दिनानिमित्त मुंबई महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ दक्षा शाह यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, टक्केवारी तसंच मृत्यूची एकूण संख्या काही वर्षांपासून जवळजवळ स्थिर असल्याचं पाहायला मिळतंय. 2021 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्यांची संख्या 10,683 होती, तर 2022 मध्ये ही संख्या 9,470 आणि 2023 मध्ये 10,077 असल्याचं समोर आलं.
WHO STEPS सर्वेक्षणात असं समोर आलंय की, 18 ते 69 वर्षे वयोगटातील 34% मुंबईकरांना उच्च रक्तदाब होता. तर 18% मधुमेह आणि 21% कोलेस्ट्रॉलच्या उच्च पातळीसाठी औषधे घेत होते. त्याचप्रमाणे 37% मुंबईकरांमध्ये धूम्रपान, उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा यासारख्या समस्या हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधीच्या आजाराच्या जोखीम घटकांपैकी असल्याचं समोर आलं.
मुंबईतील एका खाजगी रूग्णालयात २०२१ ते २०२३ या काळात केलेल्या अँजीओप्लास्टींची माहिती घेतल्यानंतर २५-३५ वयोगटातील रूग्णांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण वाढल्याचं दिसून आलं आहे.
मीरा रोडच्या वोक्हार्ट रूग्णालयाने केलेल्या ऑनलाइन सर्वेक्षणानुसार, 65 ते 67% लोक नियमितपणे त्यांच्या रक्तदाबाचे परीक्षण करत नाहीत. याशिवाय 62% लोकांनी त्यांच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल नियमितपणे तपासलं नसल्याचं समोर आलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.