Rose, Valentine Day Saam Tv
लाईफस्टाईल

Rose Huge Demand For Valentine : 'व्हॅलेंटाईन डे' निमित्त एका गुलाबाची किंमत इतक्या रुपयांनी वाढली...

Rose Huge Demand In The Market : प्रेमाच प्रतिक असणाऱ्या लाल गुलाबाला बाजारात भरघोस मागणी

कोमल दामुद्रे

Rose Price Hike Due To Valentine Day: गुलाब म्हटलं की, प्रत्येकाला व्हॅलेटाईंन डे आठवतोच. फेब्रुवारी महिन्यात गुलाबाला असंख्य प्रमाणात मागणी असते. सध्या 'व्हॅलेंटाइन डे'च्या निमित्त मार्केट यार्डातील फूल बाजारात विविध प्रकारच्या गुलाबांना मोठी मागणी वाढली आहे.

आठवडाभरात मार्केट यार्डात सुमारे १० लाख गुलाबाची आवक झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत गुलाबाच्या भावात ३०-४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. सोमवारी घाऊक फूल बाजारात दर्जानुसार गुलाबाच्या २० नगास २०० ते ३०० रुपये भाव मिळत असल्याची माहिती अखिल फूलबाजार अडते असोसिएशनचे अध्यक्ष अरुण वीर यांनी दिली.

किरकोळ बाजारात एक फूल २० -३० रुपयांना मिळत आहे. १४ फेब्रुवारीला साजऱ्या होणाऱ्या 'व्हॅलेंटाइन डे' (Valentine Day) ला एक आठवडा अगोदरपासूनच खरेदीदारांकडून मागणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

तळेगाव, मावळ, जातेगाव, शिरूर नगर याभागतून बाजारात गुलाबाची आवक होत आहे. तसेच नागपूर, सुरत, बडोदा, इंदूर, हैदराबाद, दिल्ली येथे फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. 'व्हॅलेंटाइन डे'मुळे अनेक शेतकऱ्यांनी माल राखून ठेवला होता. यंदा शेतकऱ्यांना फुलांना चांगला भाव मिळाल्याने शेतकरी समाधानी असल्याचे वीर यांनी सांगितले.

Valentine Day

1. चौकट -

सध्या सोशल मीडियाचा (Social Media) जमाना आहे. त्यामुळे इमेज तसेच व्हिडिओद्वारे प्रेम व्यक्त करण्याचा ट्रेण्ड वाढत आहे. तरीही बाजारात (Market) गुलाबाची मागणी जास्त आहे. अनेक तरुण-तरुणी सोशल मीडियावरून शुभेच्छा देण्यापेक्षा प्रत्यक्षात भेटून शुभेच्छा देत आहेत. त्यामुळेच मागील आठवड्याच्या तुलनेत बाजारात गुलाबांना मोठ्या प्रमाणावर मागणी वाढल्याचे प्रसिद्धी प्रमुख सागर भोसले यांनी सांगितले.

2. कोट -

बाजारात लाल, पांढऱ्या, पिवळ्या व इतर रंगांच्या गुलाबांना मागणी आहे. मागिल वर्षीच्या तुलनेत यंदा मागणी जास्त आहे. पॉलिहाउसमध्ये उत्पादित होणाऱ्या गडद लाल रंगाच्या फुलांना परदेशात मागणी आहे. निर्यात संपल्यानंतर बाजारपेठेत फुलांचा पुरवठा सुरू होतो. असे अखिल फूल अडते असोसिएशनचे अध्यक्ष अरुण वीर यांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prakash Solanke: मुंडेंच्या वापसीवर राष्ट्रवादीत नाराजी? कॅबिनेट मंत्रिपदावरून प्रकाश सोळंकेंचा पक्षश्रेष्ठींवर निशाणा

हृदयद्रावक! दुचाकी ट्रकच्या चाकाखाली आली, बाप अन् २ मुलींचा मृत्यू, बारामतीत भयंकर अपघात

Maharashtra Live News Update: भिमाशंकर भोरगिरी परिसरात मुसळधार पावसामुळे निसर्गाचं सौंदर्य बहरलं

Potato Eating Tips : बटाटा सोलून खावा की सालीसकट? वाचा फायदे- तोटे

Ladki Bahin Yojana: लाडकींना सरकारकडून दणका, २६.३४ लाख महिला अपात्र; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT