Mahashivratri 2023  Saam Tv
लाईफस्टाईल

Mahashivratri 2023 : महाशिवरात्रीला होईल 'या' 4 राशींवर शिवाची कृपा, रखडेली कामे होतील पूर्ण !

Mahashivratri Rashi : शिवरात्रीला भोलेनाथाचा जलाभिषेक आणि रुद्राभिषेक केल्याने महादेव स्वतः साधकाला सर्व संकटांपासून वाचवतात.

कोमल दामुद्रे

Mahashivratri Zodiac : महादेवाच्या उपासनेचा सर्वात मोठा सण महाशिवरात्री या वर्षी 18 फेब्रुवारी 2023 रोजी आहे. या दिवशी माता पार्वती आणि शिवजी यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात केला जातो.

असे मानले जाते की, शिवरात्रीला भोलेनाथाचा जलाभिषेक आणि रुद्राभिषेक केल्याने महादेव स्वतः साधकाला सर्व संकटांपासून वाचवतात. या दिवशी केवळ शिवाची स्तुती केल्याने अकाली मृत्यूचे भय नाहीसे होते.

या वर्षी महाशिवरात्रीला त्रिग्रही योग तयार होत असून, या दिवशी सूर्य, शनि आणि चंद्र कुंभ राशीत असतील. ग्रहांच्या या स्थितीमुळे अनेक राशींना पैसा, नोकरी, व्यवसायात बंपर लाभ मिळतील. जाणून घेऊया महाशिवरात्रीला कोणत्या राशींचे भाग्य खुलणार आहे.

1. मेष -

Aries

मेष राशीच्या लोकांसाठी महाशिवरात्रीचा (Mahashivratri) दिवस शुभ राहील. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना नवीन संधी मिळतील. भगवान शिवाच्या कृपेने त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. बरेच दिवस रखडलेली कामे पूर्ण होतील.

2. वृषभ -

Taurus

वृषभ राशी भोलेनाथांच्या आवडत्या राशींपैकी एक आहे. यंदाचा शिवरात्रीचा दिवस त्यांच्यासाठी खूप खास असणार आहे. ज्या लोकांच्या नोकरीत (Job) प्रगतीमध्ये अडथळे आले, त्यांना चांगली बातमी मिळेल. पगारात बंपर वाढ होऊ शकते. नवीन वाहन खरेदीसाठी शुभ काळ आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल.

3. कर्क -

Cancer

भगवान शिवाला कर्क राशीचे देवता मानले जाते. महाशिवरात्रीला कर्क राशीच्या लोकांवर भोलेनाथ कृपा करतील. पैशाच्या बाबतीत मोठा फायदा (Benefits) होईल. विविध ठिकाणांहून पैसे मिळतील. नोकरीच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होईल. उच्च अधिकार्‍यांशी संबंध चांगले राहतील.

4. कुंभ -

Aquarius

महाशिवरात्रीला कुंभ राशीत त्रिग्रही योग तयार होत आहे. या दिवशी पिता-पुत्र म्हणजेच सूर्य आणि शनि कुंभ राशीत एकत्र असतील, तर चंद्रही उपस्थित असेल. अशाप्रकारे महाशिवरात्रीचा सण तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे. नवीन काम सुरू करण्यासाठी चांगला काळ आहे, कामे पूर्ण होतील. भोलेनाथसह शनिदेवाच्या कृपेने करिअरमध्ये प्रगती होईल. व्यवसायात वाढ होईल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शेतकऱ्यांना दुष्काळातून सुखरुप बाहेर काढू - मुख्यमंत्री फडणवीस

8th Pay Commission : मोठी बातमी! ८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार बंपर वाढ, तारीख समोर

Fruits For Diabetes: डायबिटीजच्या रुग्णांनी सकाळी रिकाम्या पोटी फळे खावीत का? जाणून घ्या शरीरावर होणारे परिणाम

Lung Health : गूळ आणि तुळस खाल्ल्याने फुफ्फुसे मजबूत होतात? जाणून घ्या सत्य

गोकुळसाठी महायुतीचा ठरला फॉर्म्युला; १ वर्ष भाजपला, शिवसेना-राष्ट्रवादीला किती वर्षे अध्यक्ष मिळणार?

SCROLL FOR NEXT