Home Decorating Tips  Saam TV
लाईफस्टाईल

Home Decorating Tips : ओढणी जुनी झाली म्हणून फेकून देऊ नका; 'या' पद्धतीने तुमचं घर सजवा

Old Dupatta Use in Home Decorating : ओढणी जुनी झाल्यावर ती फेकून देण्याऐवजी तुम्ही ही ओढणी घरातील सजावटीत विविध ठिकाणी वापरू शकता.

Ruchika Jadhav

महिला आणि तरुणींकडे विविध प्रकारचे फॅशनेबल ड्रेस असतात. नवीन ड्रेस खरेदी केल्यावर त्यावर सुंदर अशी नवीन ओढणी सुद्धा मिळते. आता ड्रेस खराब होतो आणि आपण तो फेकूनही देतो. मात्र ओढणी जशीच्या तशी राहते फक्त ती जुनी झालेली असते. त्यामुळे ही ओढणी फेकून द्यावीशी वाटत नाही.

एक एक करून आपल्याकडे ओढणीचा ढिग साठतो. त्यामुळे अशा ओढणीचे आपण काय करावे आणि काय करू नये हे कुणालाच समजत नाही. म्हणूनच आज ओढणीचे तुम्ही काय काय करू शकता याची माहिती सांगणार आहोत.

उशीसाठी कवर

आपली ओढणी अगदीच लहान सुद्धा नसते आणि फार मोठी सुद्धा नसते. त्यामुळे या ओढणीचा आपण स्वत:साठी एखादा ड्रेस शिवू शकत नाही. त्यामुळे या ओढणीचा वापर तुम्ही उशीसाठी कवर बनवण्यासाठी करु शकता. यामध्ये तुम्हाला आधी ओढणी व्यवस्थित कट करून घ्यावी लागेल. त्यानंतर उशीच्या साईजनुसार ती शिवून घ्याली लागेल. ओढणीवरील डिझाइन अगदी वेगळी असते. त्यामुळे उशांवर ती फार शोभून दिसते.

टेबलसाठी कवर

आपल्या घरात लिविंग रुममध्ये असलेला टेबल तुम्ही ओढणीने कवर करू शकतात. ओढणीवर विविध नक्षी असतात. त्यामुळे त्या एकत्र करून तुम्ही एक वेगळी आणि सुंदर डिझाइन बनवू शकता. त्यामुळे टेबलवर कवरसाठी तुम्ही या ओढणीचा वापर करू शकता.

घरासाठी पडदे

घरात प्रत्येक महिला आपला बेडरुम नेहमी वेगळेगळ्या पद्धतीने सजवत असते. आता तुम्हाला देखील काही हटके करायचे असेल तर घरासाठी पडद्यांऐवजी तुम्ही ओढणीचा वापर करू शकता. ओढणीचा वापर केल्याने घरातील खिडक्या तसेच एखादे कपाट झाकण्यासाठी तुम्ही रंगिबेरंगी ओढण्यांचा वापर करू शकता.

डोअरमॅट बनवा

प्रत्येक व्यक्तीच्या घरासमोर आणि दारासमोर एक डोअरमॅट असते. डोअरमॅट असल्याने आपण त्यावर पाय स्वच्छ करू शकतो. घरात प्रवेश करताना प्रत्येक व्यक्तीचे पाय सर्वात आधी डोअरमॅटवर पडतात. त्यामुळे प्रत्येक जण आपल्या घराची शोभा वाढवण्यासाठी विविध पद्धतीच्या डोअरमॅटचा वापर करतात. तुम्ही सुद्धा तुमचं घर आणखी सुंदर व्हावं यासाठी न वापरत असलेल्या ओढण्यांना एकत्र करून त्यापासून सुंदर डोअरमॅट बनवू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT