Saree Hacks : साडी किंवा ओढणी पिनमध्ये अडकल्याने फाटत आहे? मग 'या' टिप्स नक्की फॉलो करा

Saree or Odhni pin care tips : साडीला किंवा ओढणीला पिन लावत असल्यास ते कापड फाटून जाते. आता असे तुमच्याबरोबर देखील अनेकदा घडले असेल. असे होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे?
Saree or Odhni pin care tips
Saree Hacks Saam TV
Published On

साडी नेसली किंवा मग ओढणी असलेला ड्रेस असेल तर सेफ्टी पिनच्या सहाय्याने तो व्यवस्थीत सिक्योर करावा लागतो. साडी नेसली की मिऱ्या आणि पदर सुटू नयेत म्हणून काही जण अनेक सेफ्टी पिन लावतात. सेफ्टी पिन लावल्यावर साडीला होल पडतात. सतत त्या साडीला किंवा ओढणीला पिन लावत असल्यास ते कापड फाटून जाते. आता असे तुमच्याबरोबर देखील अनेकदा घडले असेल. असे होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे? यासाठी काही महत्वाच्या टिप्स आज जाणून घेऊ.

Saree or Odhni pin care tips
Alia Bhatt Saree: १६० वर्षे जुनी साडी अन् सोन्याची जर; अनंत- राधिकाच्या लग्नात आलियाने नेसलेल्या साडीची सोशल मीडियावर चर्चा

लहान कापडाचा तुकडा

सेफ्टी पिनला मागच्या बाजूला एक लाहन छिद्र असतं. अनेकदा आपण घाईघाईत पिन काढण्याचा प्रयत्न केला की कापड या लहान छिद्रात अडकतं. ते काढताना कापड पूर्ण फाटून जातं. आता तुमच्या बरोबर सुद्धा असं काही होऊ नये म्हणून सेफ्टी पिन लावताना त्या साडीमध्ये किंवा ओढणीमध्ये आधी दुसरं एक कापड अडकवून घेतलं पाहिजे. त्यामुळे तुमची साडी फाटणार नाही.

टिकली

तुमच्याकडे अगदी छोटंसं कापड नसेल तर टिकलीचा उपयोग करा. टिकली प्रत्येक महिलेकडे असते. त्यामुळे तुम्ही साडीला जिथे पिन लावणार आहात तिथे टिकली चिटकवा आणि मग त्यावर सेफ्टी पिन लावून घ्या. असे केल्याने टिकलीमुळे तुमची साडी सेफ राहिल ती अजिबात फाटणार नाही.

मोती

जर तुमच्याकडे यातील कोणताही पर्याय नसेल तर तु्म्ही साडीला पिन लावताना त्यात एक मोती टाकू शकता. पिनमध्ये एक मोती किंवा छोटासा मनी देखील टाकला तरी सुद्धा तो पिन फार छान दिसतो. तसेच मनी थेट पिनवर असलेल्या छिद्राजवळ थांबतो, त्यामुळे सुद्धा साडी सेफ राहते. कापडाला काहीही होत नाही.

या काही सिंपल टिप्स वापरून तुम्ही तुमची साडी आणि ओढणी सेफ करू शकता. यामुळे साडी पिनमध्ये अजिबात अडकत नाही आणि फाटतही नाही. त्यामुळे प्रत्येक ओढणी घेणाऱ्या आणि साडी नेसणाऱ्या महिलेने या टिप्स फॉलो केल्याच पाहिजेत.

Saree or Odhni pin care tips
Train Traveling With Saree: साडी नेसल्यावर ट्रेन पकडताना पडण्याची भीती वाटते? मग 'या' टिप्स आजच वाचा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com