ऑक्टोबर महिना सुरु झाला आणि परतीच्या पावसाने माघार घेतली. राज्यातील अनेक भागात ऑक्टोबर हिटचे चटके जाणवू लागले आहेत.
राज्यात अनेक ठिकाणी परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. सोमवारी IDM ने कमाल ३५.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले. तापमानात अचानक वाढ झाल्यामुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवण्यात आली आहे. तापमानात अचानक वाढ झाल्यामुळे मधुमेह आणि श्वसनाचे आजार होऊ शकतात यासाठी नागरिकांनी काळजी घ्यायला हवी.
वातावरणातील तापमान वाढल्यावर शरीरातील उष्णता वाढली जाते. याबाबतची माहिती इंग्लिश इंडियन एक्सप्रेसला फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटलच्या डायरेक्टर-इंटर्नल मेडिसिन डॉ फराह इंगळे यांनी दिली आहे. त्या म्हणतात की, उष्मघातामुळे हायपरथर्मियासारखा गंभीर आजार उद्भवू शकतो.
सध्या मधुमेह (Diabetes) ही भारतातील सगळ्यात मोठी आरोग्य समस्या मानली जात आहे. ज्याचा परिणाम मुंबईच्या लोकसंख्येवर दिसून येत आहे. डॉक्टरांनी सांगितले की, वाढत्या तापमानाचा परिणाम सध्या काही प्रमाणात आरोग्यावर दिसून येत आहे. डिहायड्रेशन, अचानक शरीरातील तापमान वाढणे आणि रक्तातील साखरेच्या (Sugar) पातळीत चढ-उतार होणे ज्यामुळे ग्लुकजचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे कठीण होते.
वाढत्या उष्णतेचा परिणाम डायबिटीज मेलिटस टाईप 2 सोबत क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी)च्या रुग्णांवर दिसून येत आहे. तसेच उष्णतेमुळे हृदयविकार (Heart attack), हृदयाशी संबंधित अनेक आजार उद्भवू शकतात.
IMD मुंबईच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांच्या मते, मुंबईत पुढील २ ते ३ दिवसांत सोमवारी नोंदवलेल्या 36 अंश सेल्सिअस तापमानाप्रमाणेच वाढण्याची शक्यता आहे. खराब हवेची गुणवत्ता, वाढते उष्ण हवामान, श्वसनाचे त्रास उद्भवू लागले आहेत. त्यासाठी डॉक्टरांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.