Uttarkashi Cloudburst: उत्तरकाशीत पुन्हा ढगफुटी, नौगाव बाजार पुरात वाहिला, व्हिडिओ व्हायरल

Uttarkashi Cloudburst : उत्तरकाशी जिल्ह्यातील नौगाव भागातील देवलसारी भागात ढग फुटी झालीय.या ढगफुटीमुळे नौगाव बाजारपेठेत मातीचा चिखल वाहून वाहून आलाय. तसेच, पावसाळी नाले तुंबल्याने अनेक घरांना धोका निर्माण झालाय.
Uttarkashi Cloudburst
Cloudburst in Uttarkashi’s Naugaon: Market flooded, rescue teams on site, video goes viral.saam tv
Published On
Summary
  • उत्तरकाशीच्या नौगाव भागात ढगफुटी.

  • नौगाव बाजार चिखलाने व्यापला, घरांना धोका.

  • एसडीआरएफ आणि पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल.

उत्तरकाशीमध्ये पुन्हा एकदा नैसर्गिक संकट आलंय. जिल्ह्यातील नौगावमधील देवलसारी भागात ढगफुटी झालीय. यामुळे येथील नौगाव बाजारात मातीचा ढिगारा वाहून आला असून सर्वत्र चिखल झालाय. याचबरोबर पावसाळी ओढे-नाले दुथडी वाहू लागले आहेत. त्यामुळे आसपासच्या घरांना धोका निर्माण झालाय. पोलीस प्रशासन आणि एसडीआरएफचे जवान बचाव कार्यासाठी घटनास्थळी पोहोचलेत. दरम्यान मुख्यमंत्री धामी यांनी याबाबत ट्विटरवर पोस्ट करत माहिती दिलीय.

Uttarkashi Cloudburst
Jammu Kashmir Flood : जम्मू काश्मीरमध्ये ढगफुटी, भूस्खलन; चिनाब-झेलमला पूर, पुलवामामध्ये केली घरे रिकामी, राजोरीमध्ये आई-मुलीचा मृत्यू

उत्तरकाशी जिल्ह्यातील नौगाव भागात मुसळधार पावसामुळे नुकसान झाल्याची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर करण्याचे निर्देश दिलेत. जिल्हा प्रशासन, एसडीआरएफ आणि एनडीआरएफ पथके बाधित भागात रवाना झाली आहेत. बाधित लोकांना तातडीने सुरक्षित ठिकाणी नेण्यात आणि सर्वतोपरी मदत करण्यात विलंब होऊ नये, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

Uttarkashi Cloudburst
Akola Accident: गणेश विसर्जन करून परताना भक्तांवर काळाचा घाला; तरुणाचा जागीच मृत्यू

नौगावमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नगर पंचायतीच्या सौली खाड, नौगाव खाड आणि देवलसरी खाड या भागात पाणी साचले आहे. ज्यामुळे एक चारचाकी आणि अनेक दुचाकी वाहून गेल्या आहेत. घरांमध्ये कचरा शिरला आणि मुल्लानाजवळील एक रस्ताही वाहून गेल्याचे वृत्त आहे. नौगाव-बारकोट राष्ट्रीय महामार्ग बंद असल्याने अनेक वाहने रस्त्यावर अडकली आहेत.

दरम्यान या पावसाळ्यात वारंवार नैसर्गिक आपत्तींचा सामना करणाऱ्या उत्तराखंडमधील नुकसानीचे मूल्यांकन केलं जाणार आहे. यासाठी ७ सदस्यीय आंतर-मंत्रालयीन केंद्रीय पथक ८ सप्टेंबर रोजी राज्याला भेट देणारा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com