Health Tips freepik
लाईफस्टाईल

Health Tips: उन्हाळ्यात दररोज 'ही' एक गोष्ट खाण्याची सवय लावा, डिहायड्रेशनसह या समस्याही होतील दूर

Coconut Water for Hydration In Summer: वाढत्या तापमानासह उन्हाळा देखील सुरू झाला आहे, नारळ पाणी पिण्याची सवय लावा. नारळ पाणी प्यायल्याने शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे होतात. जाणून घ्या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

देशातील अनेक राज्यांमध्ये हवामान झपाट्याने बदलत आहे. वाढत्या तापमानासह उन्हाळाही सुरू झाला आहे. त्यामुळे प्रत्येकाने हायड्रेशनकडे लक्ष देणे खूप महत्वाचे होते. शरीराला हायड्रेट करण्यासाठी नारळ पाणीचा दररोजच्या आहारत समावेश केला पाहिजे.

तुम्हाला माहिती आहे का की, नारळपाणी केवळ शरीरातील पाण्याची कमतरता दूर करत नाही तर त्याचे इतरही अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. शरीराला त्वरित ऊर्जा देणे असो किंवा उष्णतेपासून संरक्षण करणे असो यामध्ये नारळ पाणी पिणे खूप फायदेशीर मानले जाते. तज्ज्ञांच्या मते, नारळ पाण्याचे सेवन हृदय निरोगी ठेवण्यासाठी देखील खूप फायदेशीर ठरू शकते.

नारळ पाणी आणि नारळाची मलाई

नारळाच्या मलाईमध्ये लॉरिक अॅसिड असते, जे खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित करून हृदय निरोगी ठेवते. नारळाच्या पाण्यासोबत तुम्ही नारळाची मलाई देखील खावी. नारळाची मलाई केवळ चवदार नसून तर ती पोषक तत्वांनीही देखील समृद्ध असते. यामध्ये भरपूर प्रमाणात हेल्दी फॅट्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. तसेच यामध्ये ट्रायग्लिसराइड्स असतात, जे शरीराला त्वरित ऊर्जा प्रदान करतात.

पचनासाठी नारळ फायदेशीर आहे

शरीरातील मेटबॉलिजम रेट वाढवून वजन कमी करण्यासाठी किंवा खराब कोलेस्ट्रोल नियंत्रित ठेवण्यासाठी नारळ पाणी एक हेल्दी पर्याय आहे. नारळाच्या मलाईमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. जे पचनसंस्थेला मजबूत करण्याचं काम करतात. याच्या सेवनाने बद्धकोष्ठता दूर होण्यास आणि पोटाची सूज कमी होण्यास मदत होते. हे आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरिया वाढवते.

नारळाच्या मलाईचे फायदे

नारळाच्या मलाईचे आणखी काही महत्वपूर्ण फायदे देखील आहेत. नारळाच्या मलाईमध्ये अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ई आणि हेल्दी फॅट्स देखील असतात, जे त्वचेला हायड्रेट करण्यासह चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करतात. शिवाय, ते केसांना मजबूत आणि जाड बनवण्यास देखील मदत करतात. तसेच यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असतात, जे हाडे मजबूत करतात आणि ऑस्टिओपोरोसिस सारख्या आजारापासून संरक्षण करतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola Horror : अकोल्यात धावत्या रिक्षात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, चालकाकडून भंयकर कृत्य, वाचून संताप येईल

Marathi bhasha Vijay Live Updates : वरळी डोममध्ये राज ठाकरेंची व्हॅनीटी व्हॅन दाखल, पाहा व्हिडिओ

Nashik Accident : रिक्षाच्या धडकेत दोन वर्षीय बालकाचा मृत्यू ;घराच्या समोर खेळत असतांना घडला अपघात

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Sarzameen : "यहां हर फैसला एक कुर्बानी है..."; इब्राहिम अली खानच्या 'सरजमीन'चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT