Health: कडक उन्हातही शरीराला थंडावा देणाऱ्या 'या' गोष्टींचा तुमच्या आहारात समावेश कराच!

Healthy Diet For Summer: हिवाळा संपून उन्हाळा सुरु झालाय, बदलत्या ऋतुमध्ये आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात डाएट कसा असावा जाणून घ्या.
Diet
Dietyandex
Published On

बदलत्या वातावरणासोबत आपल्या आहारातही बदल होत असतात. हिवाळा ऋतु संपून उन्हाळा ऋतुला सुरुवात झाली आहे. अशा वेळी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजे आहे. कडक उन्हामुळे डिहायड्रेशन आणि स्कीनच्या समस्येसह अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. जर वातावरणानुसार, खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल केला नाही तर अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.

डाएटमध्ये या गोष्टींचा करा समावेश

दही आणि ताक

उन्हाळ्यात दही आणि ताकाचे सेवन केल्याने पचनक्रिया निरोगी राहते. आणि शरीराला थंड ठेवण्यास मदत करते. दहीमध्ये प्रोबायोटिक्स असतं जे आतड्यांना निरोगी ठेवण्यास मदत करतात. ताकसुद्धा शरीराला थंड ठेवण्यासह पचनक्रिया सुरळीत ठेवण्याचे काम करते.

हलके जेवण खा

उन्हाळ्यात तळलेले आमि चमचमीत पदार्थ खाणं टाळा. या पदार्थांमुळे पचनाशी संबधित समस्या निर्माण होऊ शकते. याऐवजी हलके आणि लवकर पचन होईल असे अन्न खा. जसे की, खिचडी, मूग दाळ आणि सूपचा डाएटमध्ये समावेश करा. तसेच चपातीचाही डाएटमध्ये समावेश करु शकता.

Diet
Health Tip: डोक्याखाली उशी घेऊन झोपणं चांगलं की वाईट?; मणक्यावर काय परिणाम होतो?

पुदीना आणि लिंबू

पुदीना शरीराला आतून थंड ठेवण्याचं काम करतं. तुम्ही लिंबू पाणीमध्ये पुदीना मिक्स करुन पिऊ शकता. यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात. जे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास देखील मदत करतात.

डाळींचा समावेश करा

डाएटमध्ये मूगाची डाळ किंवा तूरीच्या डाळीचा समावेश करा. यामध्ये प्रोटीन, आयरन, आणि व्हिटॅमिन बी १२ मुबलक प्रमााणात आढळतात. तसेच डाळींमध्ये फायबर असल्यामुळे पोट अधिक काळ भरलेले राहते.

नारळ पाणी

उन्हाळ्याच तापमान जास्त असल्यामुळे डिहायड्रेशनची समस्या उद्बवू शकते. म्हणून दररोज नारळ पाणी प्या. यामद्ये इलेक्ट्रोलाइट्स, मिनर्ल्स आणि व्हिटॅमिन्स असतात. जे शरीराला हायड्रेट ठेवण्यासह शरीराच्या तापमानाला संतुलित ठेवण्याचे काम करतात.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Diet
Foods For Diabetes: डायबिटीज रुग्णांसाठी वरदान ठरतील 'हे' ५ सुपरफूड्स, डाएटमध्ये करा समावेश

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com