Foods For Diabetes: डायबिटीज रुग्णांसाठी वरदान ठरतील 'हे' ५ सुपरफूड्स, डाएटमध्ये करा समावेश

Superfoods for Diabetes Patients: मधुमेही रुग्णांसाठी आहार महत्त्वाचा आहे. टाइप २ डायबिटीजमध्ये रुग्णांसाठी कोणते सुपरफूड्स फायदेशीर ठरू शकतात जाणून घ्या.
Foods For Diabetes
Foods For Diabetesyandex
Published On

मधुमेह रुग्णांसाठी आहार खूप महत्त्वाचा आहे. कारण एक हेल्दी आहार आपल्याला दिवसभर तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी महत्वाचे आहे. चुकीच्या आहारामुळे डायबिटीजचा धोका वाढतो. म्हणूनच टाइप २ च्या रुग्णांना योग्य आहार आणि नियमित व्यायामासोबत वेळेवर औषधे घेण्यास सांगितले जाते. याशिवाय, टाइप २ मधुमेहाची स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी काही सुपरफूड्स खूप फायदेशीर असतात. या सूपरफूडचा दररोजच्या आहारात समावेश केल्याने डायबिटीज नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत होते.

ओट्स

ओट्समध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि मॅग्नेशियम असते. जे रक्तातील साखरेचे पचन आणि इन्सुलिन रेझिझटेन्स नियंत्रित करण्यास मदत करते. म्हणून, टाइप-२ मधुमेह असलेल्या लोकांनी नाश्त्यात ओट्स खाणे फायदेशीर ठरू शकते. ओट्समध्येही जास्त मसाले किंवा बाजारात उपलब्ध असलेले प्री अॅडिटिविह असलेले ओट्स खाऊ नका.

हिरव्या भाज्या

ऑक्सिडेटिव्ह ताण मधुमेहाची स्थिती आणखी खराब करू शकते. म्हणून, तुमच्या आहारात अँटीऑक्सिडंटयुक्त पदार्थांचा समावेश करा. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात पालक, कोबी, काळे इत्यादी हिरव्या पालेभाज्या समाविष्ट करू शकता. यासाठी तुम्ही दररोज पालकाचा ज्यूस पिण्याची सवय लावू शकता.

Foods For Diabetes
Marathi Bhasha Gourav Din: २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन का साजरा केला जातो?

बेरी

ब्लूबेरी, रास्पबेरी आणि ब्लॅकबेरीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स अॅसिडिटीसशी लढण्यास आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यास मदत करतात. त्यामुळे मधुमेहाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. या फळांचे सेवन केल्याने शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. म्हणून, टाइप-२ मधुमेहाच्या रुग्णांसाठी बेरीचे सेवन फायदेशीर मानले जाते.

मासे

मधुमेहाच्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर नियंत्रणात नसल्यामुळे हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका वाढतो. साल्मन माशांमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड असतात, जे कोलेस्टेरॉल आणि रक्तदाब कमी करून हृदयाशी संबधित आजारांचा धोका कमी करतात. एवढेच नाही तर ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता देखील सुधारतात.

एवोकाडो

मधुमेह रुग्णांसाठी एवोकाडो एक सूपरफूड आहे. एका संशोधनात असे सांगण्यात आले आहे की नाश्त्यात एवोकॅडो खाल्ल्याने साखर नियंत्रणात राहते. एवोकाडोमध्ये फायबर, पोटॅशियम आणि ल्युटीन असतात. जे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासोबतच जळजळ आणि कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतात.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Foods For Diabetes
Weight Loss: ऑफिसमध्ये बसून पोटाची चरबी वाढली आहे? बेली फॅट कमी करण्यासाठी करा 'हे' सोपे उपाय

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com