Instagrams BLUE TICK
Instagrams BLUE TICK  Saam Tv
लाईफस्टाईल

Instagram's BLUE TICK : आता Instagram च्या BLUE TICK साठी मोजावे लागणार पैसे ? कोणत्या यूजर्सना किती द्यावा लागणार शुल्क, जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Instagram's BLUE TICK : ट्विटरप्रमाणेच आता इंस्टाग्राम देखील ब्लू टिकसाठी लोकांकडून पैसे घेऊ शकते. ही गोष्ट एका रिव्हर्स इंजिनिअरने स्क्रीनशॉटच्या माध्यमातून शेअर केली आहे.

उद्योगपती एलोन मस्कने ट्विटर विकत घेतल्यापासून, या प्लॅटफॉर्मवर सातत्याने एकापेक्षा जास्त बदल होत आहेत. अलीकडेच कंपनीने अँड्रॉइड यूजर्ससाठी ट्विटर ब्लू लॉन्च केला आहे. ट्विटर ब्लूसाठी, वापरकर्त्यांना दरमहा $ 11 भरावे लागतील.

या कोडवरून हे कळते की लवकरच मेटा, फेसबुक आणि इंस्टाग्राम (Instagram) या दोन्ही प्लॅटफॉर्मवर ब्लू टिक फीचरचे पैसे दिले जाऊ शकतात. कोडमधील IDV चा अर्थ "ओळख पडताळणी" आहे. मात्र, मेटा किंवा इन्स्टाग्रामने या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

म्हणूनच इंस्टाग्रामवर ब्लू टिक्स घेणे पेड झाले आहे असे म्हणणे खूप घाईचे आहे. इंटरनेटवरील काही रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की इंस्टाग्राम देखील ब्लू टिक्ससाठी ट्विटरच्या (Twitter) बरोबरीने शुल्क आकारू शकते. लक्ष द्या, अधिकृतपणे कंपनीने यावर अद्याप भाष्य केलेले नाही.

ट्विटर इतके शुल्क आकारते -

सध्या, Twitter हे वेब वापरकर्त्यांकडून Twitter Blue साठी $8 आकारते. त्याच वेळी, iOS आणि Android वापरकर्त्यांकडून, कंपनी ब्लू टिक आणि इतर फायद्यांसाठी दरमहा $ 11 आकारते.

ट्विटर ब्लूची सेवा सध्या यूएस, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जपान, यूके, सौदी अरेबिया, फ्रान्स, जर्मनी, इटली, पोर्तुगाल आणि स्पेनमध्ये उपलब्ध आहे. ट्विटरने अद्याप भारतात 'ट्विटर ब्लू' लाँच केलेले नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Tourist: उन्हाळ्याची सुट्टी घालवा रत्नागिरीत; 'ही' ७ ठिकाणे आहेत खास

Maval Lok Sabha: मावळचा गड राखण्यासाठी महायुतीचा प्लॅन काय? जाणून घ्या

RCB Vs GT : आरसीबीचा घरच्या मैदानावर मोठा विजय; गुजरातला नमवत ७ व्या क्रमांकावर झेप

KPK Jeyakumar : काँग्रेस नेत्याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ; दोन दिवसांपासून होते बेपत्ता

Riteish Deshmukh: मराठमोळ्या रितेश देशमुखची 'लय भारी...' फॅशन

SCROLL FOR NEXT