Pillow Cleaning Tips  Saam Tv
लाईफस्टाईल

Pillow Cleaning Tips : फक्त कवरच नाही तर, उशीसुद्धा आहे आरोग्याला घातक, साफ करण्यासाठी या टिप्स फॉलो करा

Cleaning Tips : पिलोच्या कव्हर सोबत पिलो धुणे सुद्धा अत्यंत गरजेचे असते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Cleaning Health Tips : तुम्ही तुमचा पिलो साफ ठेवण्यासाठी काय करता ? तुमच्या मधील अनेक व्यक्तींचे उत्तर असे असेल की आम्ही आमच्या पिलोला कव्हर घालतो, पीलोला यामध्ये ठेवतो. परंतु ही कारण पुरेशी नाहीत.

पिलोच्या कव्हर सोबत पिलो धुणे सुद्धा अत्यंत गरजेचे असते. परंतु लोक (People) पिलो धुण्यासाठी जी पद्धत वापरतात ती त्यांच्या फारशी कामी येत नाही. अनेकवेळा पिलो धुवून सुद्धा त्यावरती काळे डाग, धुळ माती आणि सूक्ष्मजीव तसेच राहतात. परंतु यांना धुतले नाही तर, त्यामधील बॅक्टेरिया तुमची स्किन आणि तुमचे केस खराब करू शकतात.

त्यामुळे धुतलेले कव्हर घालून नवीन आणि चांगले समजण्याची चूक करू नका. परंतु उशी कशा पद्धतीने धुवावी ? उशी धुण्यासाठी आम्ही तुम्हाला आज काही खास टिप्स (Tips) सांगणार आहोत. जेणेकरून तुमची उशी पुन्हा नव्यासारखी दिसेल. सोबतच उशीवर डस्ट दिसणार नाही.

तुम्ही उशी धुतली नाहीत तर काय होईल ?

जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा तुमच्या शरीरामधील हजार डेड स्किन सेल्स बाहेर निघतात. ते तुमच्या बेडवरती आणि उशीवरती लागतात. हे डेड स्किन सेल्स आणि उशिवरील धूळ एकत्र येऊन टॉक्सिक बनते. ज्यामुळे एलर्जी, खाज येणे, अस्थमा यांसारख्या आजारांचा सामना करावा लागतो. सोबतच तुमची स्कीन आणि तुमचे केस खराब होऊ शकतात.

वर्षभरातून किती वेळा उशी धुतली पाहिजे -

उशीच्या कव्हरला आठवड्यामधून एक ते दोन वेळा धुने अत्यंत गरजेचे असते. परंतु उशीला वर्षामधून तीन ते चारवेळा धुणे गरजेचे असते. असं केल्याने तुमची उशी नव्यासारखी बनून राहील.

हाताने उशी कशी धुवावी ?

उशी हाताने धुण्याची सोपी पद्धत म्हणजे, एक टबभरून गरम पाणी घ्या. त्यामध्ये डिटर्जंट ची पावडर किंवा लिक्विड टाका. आता उशिला त्या पाण्यामध्ये बुडवून काही वेळासाठी तसंच ठेवा. पुन्हा एकदा हाताने उशीला रगडा. दहा मिनिटानंतर उशिला गरम पाण्याने धुवा. त्यानंतर सुकण्यासाठी उन्हामध्ये वाळत घाला.

मशीनमध्ये कशाप्रकारे धुवावी उशी ?

उशी धून्याआधी तिथे लेबल व्यवस्थित पहा. तिच्यावर असे लिहिले असेल की, ही उशि मशीनमध्ये धुतली जाऊ शकते. तरच ती उशी मशीनमध्ये धुण्यासाठी टाका. मशिनला उशी धुण्यासाठी तिला उभी ठेवा आणि हेमशा दोन उशा सोबत धुवा.

मशीनमध्ये उशीसोबत इतर कपडे टाकण्याचा मूर्खपणा करु नका. आता यामध्ये माइल्ड लिक्वीड टाका. आता त्यामध्ये कोमट पाणी टाकून दोनवेळा मशीन गोल गोल फिरवा. आता ही उशी पिळून उन्हामध्ये सुकत टाका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लाडक्या बहिणींना सरकारकडून दिवाळी भेट; E-KYC करणाऱ्यांना हप्ता मिळाला की नाही?

Maharashtra Live News Update : - पहिल्या वर्षापासून हिंदी सक्तीला नागपूरातील तज्ज्ञांचा विरोध

Silver Rate : सुवर्ण बाजारात चांदीला चकाकी, तब्बल २१ हजार रूपयांनी दर वाढले, वाचा सविस्तर

Shankarpali Recipe : ना रवा ना मैदा, 'अशी' बनवा खुसखुशीत शंकरपाळी

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांची अलिबागमध्ये मोठी गुंतवणूक; खरेदी केले 3 प्लॉट, किंमत वाचून पायाखालची जमीन सरकेल

SCROLL FOR NEXT