Lung Cancer Symptoms saam tv
लाईफस्टाईल

Lung Cancer : केवळ खोकलाच नाही तर हाता-पायांमध्ये दिसणारे 'हे' बदल असतात लंग कॅन्सरचं लक्षणं; 99% लोकं करतात इग्नोर

Lung Cancer Symptoms : फुफ्फुसांचा कर्करोग हा एक गंभीर आजार आहे, जो फुफ्फुसांच्या पेशींमध्ये अनियंत्रित वाढ होऊन विकसित होतो. हा घातक कॅन्सर जगभरात मृत्यूंचे एक मोठे कारण ठरला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

कॅन्सर म्हटलं की, प्रत्येकाच्या पायाखालची जमीन सरकते. मुळात फुफ्फुसाच्या कॅन्सरचे अनेक प्रकार आहेत. जर सुरुवातीच्या टप्प्यात या कॅन्सरचं निदान झालं तर त्यावर उपचार करता येतात. फुफ्फुसाच्या कॅन्सरचे सुरुवातीच्या टप्प्यात निदान करण्याचा एक मार्ग म्हणजे फुफ्फुसाच्या कर्करोगाची लक्षणे ओळखणे.

फुफ्फुसांचा कॅन्सर हा एक प्रकारचा कॅन्सर आहे जो फुफ्फुसांच्या पेशींमध्ये वाढतो. हा आजार जीवघेणार असून जगभरात या कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमुख कारण आहे. ज्यामुळे २०२० मध्ये सुमारे १८ लाख मृत्यू झाले आहेत, जे सुमारे १८ टक्के आहे. या संख्येत धूम्रपान करणारे आणि धूम्रपान न करणारे दोघेही समाविष्ट आहेत. धूम्रपान करणाऱ्या लोकांसाठी हा धोका खूप जास्त असतो, तर धूम्रपान न करणाऱ्यांसाठी हा धोका कमी असतो.

काय दिसून येतात लक्षणं?

बोटांना सूज येणं

हात आणि पायांवर फुफ्फुसांच्या कॅन्सरच्या सर्वात सामान्य लक्षणांपैकी एक म्हणजे डिजिटल क्लबिंग. या स्थितीमुळे बोटांच्या किंवा पायाच्या टोकांना सूज येते. ज्यामुळे बोटं काही प्रमाणात गोल दिसू लागतात. यावेळी नखं मऊ होऊ शकतात आणि बोटांच्या टोकांभोवती थोडं वाकलेली दिसू शकतात. रक्तातील ऑक्सिजनच्या पातळीत बदल झाल्यामुळे क्लबिंग होतं.

हात आणि पाय दुखणं

फुफ्फुसाचा कॅन्सर असलेल्या काही लोकांना कोणत्याही कारणाशिवाय हात आणि पाय दुखणं किंवा सूज येण्याची शक्यता असते. हे ट्यूमरमुळे नसा किंवा रक्तवाहिन्यांवर दबाव पडल्यामुळे असू शकतं. यामुळे हात आणि पायांमध्ये सूज येण्याची समस्या जाणवते. कॅन्सर पसरल्यामुळे किंवा लसीका प्रणालीवर परिणाम होतो आणि या वेदना होऊ शकतात.

नखांचा रंग बदलणं

फुफ्फुसांच्या कॅन्सरमुळे कधीकधी नखांचा रंग बदलू शकतो. जसं की, तुमच्या नखांचा आणि पायांच्या नखांचा रंग निळा किंवा जांभळा होणं. फुफ्फुसांचा कॅन्सर ऑक्सिजनच्या अभिसरणात व्यत्यय आणू शकतो म्हणून हे घडतं. त्यामुळे रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी होऊ लागते. यामुळे नखे गडद किंवा रंगहीन दिसण्याची शक्यता असते.

एडेमा

एडेमा म्हणजे ऊतींमध्ये जास्त द्रव जमा होणं, ज्यामुळे हात आणि पाय सूजू शकतात. हे फुफ्फुसांच्या कॅन्सरमुळे रक्ताभिसरण प्रभावित होत असल्याचं लक्षण मानलं जातं. छातीतील लिम्फ नोड्स किंवा रक्तवाहिन्यांमध्ये कॅन्सर पसरल्यामुळे देखील हे होऊ शकते.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: झेंडा, स्कार्फ, पक्षचिन्ह काहीच नको; मोर्चाला येण्याआधी राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश

Crime: विद्यार्थ्यावर कधी कार, तर कधी फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये अत्याचार, गोळ्याही द्यायची; मुंबईतील शिक्षिकेचे धक्कादायक कारनामे उघड

Maharashtra Live News Update: बदलापुरात आमदार किसन कथोरेंच्या घराबाहेरील रस्त्यावर गोळीबार

PF Balance Check: आता इंटरनेटशिवायही काही सेकंदात पीएफ बॅलन्स चेक करु शकता, कसं? वाचा

मुख्यमंत्र्यांच्या 'Flying Squad'चा जुगार अड्ड्यावर छापा! ५५ गॅम्बलरला अटक; १२ लाख रोकड, ४६ मोबाईल अन् डझनभर गाड्या जप्त

SCROLL FOR NEXT