अजबच! 'या' ठिकाणी 70 वर्षांपासून एकही मृत्यू नाही Saam Tv
लाईफस्टाईल

अजबच! 'या' ठिकाणी 70 वर्षांपासून एकही मृत्यू नाही

हे ऐकून तुम्हाला विचित्र वाटेल, पण हे सत्य आहे.

वृत्तसंस्था

नॉर्वे - आपल्या जगात अशी अनेक अनोखी ठिकाणे आहेत ज्यांच्यावर कोणाचाही लगेच विश्वास बसत नाही. अशी एक जागा आहे, ज्याबद्दल माहिती झाल्यावर तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल. या ठिकाणी 70 वर्षात एकही मृत्यू झाला नाही. हे ऐकून तुम्हाला विचित्र वाटेल, पण हे सत्य आहे. हे अनोखे ठिकाण नॉर्वे मध्ये आहे. नॉर्वेमधील या जागेचे नाव लाँग इअरबेन आहे. या ठिकाणी 70 वर्षांपासून एकही मृत्यू झालेला नाही.

हे देखील पहा -

याचे कारण जाणून तुम्हला देखील आश्चर्य वाटेल. नॉर्वेला मध्यरात्री सूर्य म्हणून देखील ओळखले जाते. या देशात मे महिन्यापासून जुलैच्या अखेरीपर्यंत सूर्य मावळत नाही. येथे 76 दिवस सतत दिवस असतो. इथे स्वालबार्ड मध्ये सुद्धा १० एप्रिल ते २३ ऑगस्ट पर्यंत सूर्य मावळत नाही. लॉंग इअरबेन येथील प्रशासनाने एक कायदा केला आहे, ज्यामुळे या ठिकाणी 70 वर्षांपासून एकही मृत्यू झालेला नाही.

येथे मानवांच्या मृत्यूवर बंदी घालण्यात आली आहे. नॉर्वेच्या उत्तर ध्रुवावर स्थित लाँग इअरबेनला वर्षभर तीव्र थंडी असते, ज्यामुळे मृतदेह इथे विघटित होत नाही. यामुळे येथील प्रशासनाने मानवांच्या मृत्यूवर बंदी घातली आहे. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या शहरात 70 वर्षांपासून एकही मृत्यू झालेला नाही.या शहरात ख्रिस्ती धर्माचे लोक राहतात.

वर्ष 1917 मध्ये, इन्फ्लूएन्झामुळे ग्रस्त एका व्यक्तीचा या ठिकणी मृत्यू झाला. त्या माणसाचा मृतदेह लाँग इअरबेनमध्ये पुरला गेला होता, पण त्याच्या शरीरात अद्याप देखील इन्फ्लूएन्झा व्हायरस असल्याची माहिती समोर आली. यामुळे, प्रशासनाने येथे मानवांच्या मृत्यूवर बंदी घातली आहे. जेणेकरून शहर कोणत्याही साथी पासून वाचू शकेल. सुमारे 2000 या शहराची लोकसंख्या आहे. एखादी व्यक्ती जर या ठिकणी आजारी पडली तर त्या व्यक्तीला विमानाने दुसऱ्या ठिकाणी नेले जाते आणि त्याच ठिकाणी मृत्यूनंतर त्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले जातात.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Famous Couple : "प्रेमाला हळदीचा रंग लागला..."; प्रसिद्ध मराठी जोडपं लवकरच अडकणार लग्न बंधनात, पाहा PHOTOS

Maharashtra Live News Update: शरद पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा

अमेरिकेकडून 'कापूस'कोंडी! बांगलादेशला फक्त ० टक्के, तर भारतावर १८ टक्केंचे आयत शुल्क

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट; सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

Pune Politics: पुण्यात भाजपकडून मोठी कारवाई, ६९ पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन

SCROLL FOR NEXT