पंतप्रधान मोदी सकाळी 10 वाजता साधणार जनतेशी संवाद

तिसऱ्या लाटेची शक्यता तसेच त्यापासून वाचण्यासाठी आवश्यक असलेली खबरदारी इत्यादी बाबींवर पंतप्रधान मोदी बोलण्याची शक्यता
पंतप्रधान मोदी सकाळी 10 वाजता साधणार जनतेशी संवाद
पंतप्रधान मोदी सकाळी 10 वाजता साधणार जनतेशी संवादSaam Tv
Published On

नवी दिल्ली - आज सकाळी १० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना संबोधित करणार आहे. याबाबतची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली आहे. देशात काल लसीकरणाचा १०० कोटी डोसचा टप्पा पार पडला. त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांशी संवाद साधणार आहेत. यावेळी लसीकरण आणि तिसऱ्या लाटेची शक्यता तसेच त्यापासून वाचण्यासाठी आवश्यक असलेली खबरदारी इत्यादी बाबींवर पंतप्रधान मोदी बोलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कोरोना विषाणूच्या साथीच्या Corona Wave India लढाई युद्धात भारताने एक मोठा विक्रम केला आहे. भारतातील लसीकरणाचा Vaccination India आकडा 100 कोटींच्या पुढे गेला आहे. आतापर्यंत जगात फक्त चीनने 100 कोटींहून अधिक लसीकरण केले आहे. परंतु 100 कोटी लसीकरणाचा आकडा पार केलेल्या चीननंतर भारत असा पराक्रम करणारा दुसरा देश बनला आहे.

पंतप्रधान मोदी सकाळी 10 वाजता साधणार जनतेशी संवाद
स्वाभिमानी शेतकऱ्यांच्या अजब मागणीने प्रशासन चक्रावले...

भारतात आतापर्यंत, 18 वर्षांवरील 75 टक्के लोकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर 31 टक्क्यांहून अधिक लोकांना पूर्णपणे लसीकरण करण्यात आले आहे.

75% प्रौढांचे लसीकरण;

विशेष म्हणजे 75% सर्व प्रौढांना लसीचा पहिला डोस First Dose Of Corona Vaccine देण्यात आला आहे. 100 कोटी डोसचे लक्ष्य पूर्ण केल्याबद्दल देशामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन आज करण्यात आले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com