बुलढाणा - सामाजिक राजकीय संघटनांसह सामान्य व्यक्तींकडून निवेदनाद्वारे आपल्या न्याय हक्कासाठी विविध मागण्या शासन व प्रशासनाकडे केल्या जातात. मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शेतात एका एकर शेतात चक्क हर्बल गांजा पिकविण्याची परवानगी मागितली एवढेच नव्हे तर त्यासाठी बियाणे शासनाने उपलब्ध करून द्यावे अशी आग्रही मागणी सुद्धा केली आहे. ह्या अजब तऱ्हेच्या निवेदनानंतर प्रशासन चक्रावले आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मधुकर शिंगणे, जुल्फिकार शेख व सतीश मोरे शेतकरी चळवळीत गत अनेक वर्षांपासून काम करणारे स्वाभिमानी कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन गाजविणाऱ्या राजू शेट्टी व रविकांत तुपकर यांच्या या कार्यकर्त्यांनी देऊळगावराजा येथील तहसीलदार यांच्या दालनात एक निवेदन घेऊन एन्ट्री केली त्यावेळी अतिवृष्टी मुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी या मागणीसाठी त्यांनी महसूल कार्यालय गाठले.
हे देखील पहा -
दरम्यान तहसीलदार श्याम धनमने यांनी निवेदन स्वीकारून त्यावर नजर टाकली त्यावेळी त्यांचा ग्रह चुकीचा ठरला निवेदनातील विषय आणि मागणी अनपेक्षितच नव्हे तर चक्रवणारी होती, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजीपाला, कडधान्य उत्पादनाची शेती परवडत नाही, शेतीमालाला बाजारात भाव नाही, शासनाचा हमीभाव नसल्याने शेती तोट्यात जात आहे अशी विविध कारणे सांगून शेतातील एका एकर वर चक्क हरबल गांजा उत्पादनाची परवानगी देण्यात यावी अशी मागणी केली. एवढेच नव्हे तर गांजा पिकाचे बियाणे शासनाने उपलब्ध करून द्यावे असा आग्रह ही धरला आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे शासना कडे केलेल्या अजब मागणी ने प्रशासन ही चक्रावले आहे.
महाराष्ट्र राज्याचे मंत्री नवाब मलिक यांचे जावई यांच्या शेतात हर्बल गांजाचे पीक सापडल्याची बातमी मागील आठवड्यात राज्यभरात प्रसारमाध्यमातून झळकली असतांना देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी सदर प्रकार सुगंधी हरबल वनस्पती असल्याचे वक्तव्य केले. या वक्तव्या नंतर शेतकऱ्यांना बिकट परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी एका एकरीत हरबल गांजा पिकविण्याची परवानगी देण्याची उपरोधक मागणी सदर निवेदनात बोल्ड अक्षरात नमूद केली.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.