No Smoking Day 2024, Smoking Side Effects Saam Tv
लाईफस्टाईल

No Smoking Day 2024 : महिलांनो, धुम्रपान केल्यामुळे येतेय वंध्यत्व, वेळीच थांबा!

Smoking Side Effects : सिगारेट ओढणे आपल्या आरोग्यासाठी अधिक घातक आहे. अनेकजण तणावापासून सुटका मिळवण्यासाठी धुम्रपान करतात. सिगारेटमध्ये तंबाखू असते, त्यात असणारे निकोटीन नावाच्या पदार्थामुळे तुम्हाला व्यसन लागते.

कोमल दामुद्रे

Smoking Affect Lung :

चहा टपरीवर किंवा पानपट्टीवर सिगारेटचा धूर उडताना आपण सहज पाहातो. सिगारेट ओढणे आपल्या आरोग्यासाठी अधिक घातक आहे. अनेकजण तणावापासून सुटका मिळवण्यासाठी धुम्रपान करतात.

सिगारेटमध्ये तंबाखू असते, त्यात असणारे निकोटीन नावाच्या पदार्थामुळे तुम्हाला व्यसन लागते. सिगारेटच्या धुराने आपल्या शरीरात प्रवेश केल्याने मेंदू आणि मज्जातंतूंवर परिणाम होतो. ज्यामुळे काही वेळेसाठी आपल्याला बरे वाटते. परंतु, याची एकदा सवय लागली की, आपल्याला वारंवार करण्याची इच्छा होते. त्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.

सिगारेटच्या धुरामधून अनेक खराब आणि धोकादायक वायू बाहेर पडतात. ज्यामध्ये कार्बन मोनोऑक्साइड, सल्फर ऑक्साईड आणि इतर वायूंचा समावेश असतो. ज्यामुळे हे श्वसननलिकेच्या आतून फुफ्फुसांवर परिणाम करतात. यात सीपीओडीसोबत दम्याची लक्षणे उद्भवतात. त्यामुळे कर्करोगासारखा (Cancer) गंभीर आजार (Disease) होण्याची शक्यता असते.

धुम्रपान केल्यामुळे फुफ्फुसांवर परिणाम होतो. यात असणारे कण शरीरात खोलवर पोहोचतात आणि रक्तवाहिन्यांमध्ये प्रवेश करतात. ज्यामुळे ब्लॉकेज तयार होतात. त्यामुळे हृदयविकाराचा झटका (Heart attack) आणि पक्षाघाताचा धोका वाढतो.

जर महिलावर्ग धुम्रपान करत असतील तर त्यांना देखील अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यामुळे प्रजनन क्षमतेवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे वंध्यत्व येते. तसेच भविष्यात गर्भधारणा करण्यासाठी अनेक अडचणी येऊ शकतात. फुफ्फुसाचे नुकसान झाल्यामुळे थकवा जाणवणे, श्लेष्मा, अंगदुखी, खोकला येणे, अचानक वजन कमी होणे, दम्याचा त्रास उद्भवू शकतो. यासाठी वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UPI Rules: UPI वापरात मोठा बदल! १ ऑगस्टपासून ५ नवे नियम; थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम

Daily Shravan Remedies : श्रावणात रोज नक्की करा हे ५ उपाय; मिळेल सुख, शांती आणि आर्थिक स्थैर्य

Pune Rain : पुणेकर! समाधानकारक पाऊस झाला का? भिडे पूल पाण्याखाली, मुठा नदीत विसर्ग वाढवला

Doctor Stress: डॉक्टरही असतात मानसिक तणावात! जाणून घ्या त्यामागची खरी कारणं

Maharashtra Live News Update: पुण्यात कंटेनरला भीषण आग

SCROLL FOR NEXT