Mukesh Ambani Diet  Saam TV
लाईफस्टाईल

Mukesh Ambani Diet : गडगंज संपत्ती असूनही खावे लागतात हे पदार्थ; नीता अंबानी यांनी स्वतः दिली पतीच्या डाएटची माहिती

Anant and Radhika Wedding Celebration : प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी त्यांच्या रोजच्या जीवनात अतिशय साधा आहार घेतात. त्यांच्या डाएटबाबत स्वत: त्यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी खुलासा केला आहे.

Ruchika Jadhav

प्रत्येक व्यक्तीला चमचमीच आणि रेस्टॉरंटमध्ये मिळणारे टेस्टी पदार्थ खाणे आवडतं. त्यात जर तुमच्याकडे सर्वात जास्त पैसे आले किंवा लॉटरी लागली की तुम्ही काय करणार? असं विचारताच आम्ही भरपूर टेस्टी आणि महागडे पदार्थ खाणार असं अपसूकच अनेकांच्या तोंडून निघतं. मात्र तुम्हाला माहितीये का, प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी त्यांच्या रोजच्या जीवनात अतिशय साधा आहार घेतात. त्यांच्या डाएटबाबत स्वत: त्यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी खुलासा केला आहे.

टाइम्स ऑफ इंडिया या माध्यम संस्थेला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये नीता अंबानी यांनी ही माहिती दिली आहे. त्यावेळी त्यांनी सांगितले की, मुकेश अंबानी दररोज अगदी साधं आणि घरचं जेवण खाणे पसंत करतात. त्यांना बाहेर बनवणलेले पदार्थ आवडत नाहीत. बाहेर कितीही उशिर झाला तरी ते घरी आल्यावर घसचं ताजं अन्न खातात.

मुकेश अंबानी यांचं फेव्हरेट फूड

मुकेश अंबानी फक्त घरातील पदार्थ खातात. त्यात त्यांना व्हेज पदार्थ जास्त आवडतात. त्यांच्या डायेट चार्ट बद्दल सांगताना नीता म्हणाल्या की, अगदी क्वचीतच महिन्यातून एकदाच ते बाहेर रेस्टॉरंटमध्ये जेवण करतात.

मुकेश अंबानी यांच्या आवडीच्या गुजराती डिशचे नाव पनकी असं आहे. पनकी एक स्नॅक्स आहे. तांदळाच्या पिठात विविध मसाले टाकून केळीच्या मानांमध्ये ही रेसिपी बनवली जाते. त्यावर चीज देखील टाकलं जातं. लोणचं किंवा सॉससोबत हा पदार्थ फारच स्वादिष्ट लागतो.

मुकेश अंबानी रोज सकाळी ५.३० ला उठतात. एवढ्या पहाटे उठल्यावर ते आधी मॉर्निंग वॉकसाठी जातात. त्यानंतर नाश्त्यामध्ये ते फळं, दूध आणि इडली सांबार असे पदार्थ खाणे पसंत करतात, नीता अंबानी यांनी स्वत: ही माहिती दिलेली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government Job: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये भरती सुरु; अर्ज कसा करावा?

IND vs NZ: 'अरे याला तर हिंदी येतं...', रिषभ- वॉशिंग्टनचा मजेशीर संवादाचा VIDEO व्हायरल

Ahilyanagar Crime: दुहेरी हत्याकांडातील आरोपीची शाही मिरवणूक! हत्या केलेल्यांच्या घरासमोर फटाक्यांची आतषबाजी, नगरमधील घटना

Maharashtra News Live Updates: झिशान सिद्दीकी यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Gevrai Assembly Constituency : ना मविआ ना महाविकास आघाडी; लक्ष्मण पवारांचं ठरलं, अपक्षमधून लढणार

SCROLL FOR NEXT