Nirjala Ekdashi
Nirjala Ekdashi Saam Tv
लाईफस्टाईल

Nirjala Ekadashi: निर्जला एकादशीला जुळून येतोय शुभ योग, जाणून घ्या व्रताचे महत्त्व व पूजा विधी

कोमल दामुद्रे

Nirjala Ekadashi Importance : एकादशीच्या उपवासाला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. या व्रताच्या दिवशी सूर्योदयापासून द्वादशीच्या सूर्योदयापर्यंत पाणी व अन्न घेतले जात नाही. निर्जला एकादशीचे व्रत करणारा मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होऊन मोक्षप्राप्ती करतो, अशी श्रद्धा आहे.

यावर्षी 31 मे 2023 रोजी निर्जला एकादशी व्रत केले जाणार आहे. निर्जला एकादशीला भीमसेनी एकादशी (Ekadashi) असेही म्हणतात. चला तर मग जाणून घेऊया या व्रताचे महत्त्व आणि पूजेची पद्धत.

1. कधी आहे निर्जला एकादशी 2023

हिंदू पंचागानुसार ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला निर्जला एकादशीचा उपवास केला जातो. हे व्रत 30 मे 2023 रोजी दुपारी 01:07 वाजता सुरू होईल आणि 31 मे रोजी दुपारी 01:45 वाजता समाप्त होईल. यावर्षी निर्जला एकादशी 31 मे 2023, बुधवारी साजरी केली जाईल.

2. कसा कराल उपवास (Fast)

  • एकादशीच्या दिवशी गंगेत स्नान करणे फार महत्वाचे आहे.

  • स्नानानंतर भगवान विष्णूला तुळशी, पिवळे चंदन, रोळी, अक्षता, पिवळी फुले, फळे, धूप, साखर अर्पण करा.

  • यानंतर 'ओम नमो भगवते वासुदेवाय' हा जप करावा.

  • या दिवशी गुरेढोरे, कपडे, छत्री, वहाणा, फळे, पाणी इत्यादी दान केल्याने व्यक्तीच्या जीवनातील अडचणी दूर होतात.

  • या दिवशी रात्री जागरण करण्याची मान्यता आहे.

  • द्वादशीच्या दिवशी सूर्योदयानंतर ब्राह्मणाला अन्न व दक्षिणा देऊन अन्नपाणी घ्यावे.

3. जलदान करताना हा मंत्र जपा

देवदेव हृषीकेश संसारार्णावतारक ।

उदकुंभप्रदेन नया मां परमं गतिम् ॥

या दिवशी या मंत्राचा उच्चार करून शुद्ध पाण्याने भरलेला घागर गरजू व्यक्ती किंवा ब्राह्मणाला दान करावा. यामुळे सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते.

4. निर्जला एकादशीला चुकूनही हे काम करू नका

  • या दिवशी उशिरा झोपू नका.

  • या दिवशी काळे कपडे घालू नका.

  • या दिवशी केस (Hair) कापणे, मुंडण आणि नखे करू नयेत.

  • या दिवशी कांदा (Onion) लसूण खाऊ नये.

  • या दिवशी कोणी उपवास केला नसला तरी त्याने या दिवशी भात खाऊ नये.

  • या दिवशी भात व वांगी खाऊ नयेत.

5. एकादशीच्या दिवशी हे उपाय करा

  • या दिवशी पिवळे कपडे, फळे, चप्पल, पाणी, सरबत इत्यादी दान करा.

  • पितृदोष आणि चंद्रदोष दूर करण्यासाठी निर्जला एकादशीला जल दान करा.

  • निर्जला एकादशीला जलाभिषेक करून गोड पाणी व सरबत वाटावे.

  • या दिवशी पक्ष्यांना चारा आणि गायीला चारा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahadev Jankar: मरेन पण हाती कमळ, धनुष्यबाण घेणार नाही: महादेव जानकर

May Month Horoscope : 10 मे रोजी बुध मंगळ राशीत करणार प्रवेश, या राशीच्या लोकांना होणार धनलाभ

Baramati Lok Sabha: कमी मतदानाचा कोणाला मिळणार फायदा? खडकवासला ठरवणार बारामतीचा खासदार?

Shirur LokSabha Election: शिरूरमध्ये अजितदादांची फिल्डिंग की पवारांचं होल्डिंग?; दोन्ही पवारांचा शिरूरकडे मोर्चा

Nagpur Crime: पत्नीने दिला थंड भात, नवऱ्याला आला संताप अन् लावला गळाला फास; पण..

SCROLL FOR NEXT