Cancer Symptoms saam tv
लाईफस्टाईल

Cancer Symptoms: सावधान! झोपल्यावर प्रचंड घाम येतोय?असू शकतं कॅन्सरचं लक्षण

Cancer Alert: सकाळी उठल्यावर घामाचे डाग दिसत असतील तर हा कॅन्सरचा सुरुवातीचा संकेत असू शकतो. अशा लक्षणांकडे दुर्लक्ष न करता त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या.

Sakshi Sunil Jadhav

सकाळी उठल्यावर घाम येणे हे “नाईट स्वेट्स” असू शकतात.

अशा लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास कॅन्सरचे निदान उशिरा होऊ शकते.

काही कॅन्सर प्रकारांमध्ये रात्री अतिघाम येणे हे सुरुवातीचे लक्षण असते.

कॅन्सर या आजाराचे नाव घेताच अनेकांना भीती वाटते. या आजाराचे २०० पेक्षा जास्त प्रकार आणि असंख्य लक्षणे आहेत. या आजारावर उपचार करुन नियंत्रण मिळवणं फार कठीण असतं. मात्र, वेळेवर लक्षणे ओळखल्यास उपचार अधिक प्रभावी होऊ शकतात. कॅन्सर रिसर्चच्या अहवालानुसार, संसर्गामुळे शरीराचे तापमान वाढल्याने घाम येणे ही रुग्णांमध्ये दिसणारी एक सामान्य प्रतिक्रिया आहे.

काही विशिष्ट प्रकारच्या कॅन्सरमध्येही शरीराला अनावश्यकरीत्या घाम येतो. विशेषतः कॅन्सरच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये रुग्णांना रात्रीच्या वेळी अतिघाम येण्याचा त्रास जाणवतो. अशा वेळी रुग्णांना वजन झपाट्याने कमी होणे, थकवा, त्वचेमध्ये बदल, गाठी निर्माण होणे, अस्पष्ट रक्तस्त्राव किंवा सतत पोट फुगल्यासारखे वाटणे यासारखी लक्षणे दिसू शकतात. मात्र या सगळ्या लक्षणांमध्ये एक संकेत असा आहे जो अनेकदा लोक दुर्लक्षित करतात तो म्हणजे रात्री झोपेत अतिघाम येणे.

वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, सकाळी उठल्यावर आपल्या चादरी किंवा कपड्यांवर घामाचे डाग किंवा ओलसरपणा दिसल्यास हे लक्षात घ्यावे. एनएचएसच्या माहितीनुसार, खोली गरम नसताना किंवा हवामान सामान्य असतानाही जर झोपताना कपडे आणि बेडशीट पूर्ण ओले होतात, तर हे “नाईट स्वेट्स” म्हणून ओळखले जाते.

कॅन्सरची अनेक लक्षणे शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर दिसू शकतात. त्यामुळे आपल्या शरीरातील बदल ओळखणे आणि संशयास्पद लक्षणांवर दुर्लक्ष न करता तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. प्रत्येकवेळी घाम येणे म्हणजे कॅन्सरच असे नसले तरी, जर तो आपल्यासाठी असामान्य असेल, तर वैद्यकीय तपासणी करून घेणे योग्य ठरेल. काही प्रकारच्या कॅन्सरमध्ये अतिघाम येणे हे लक्षण दिसून येते. यात नॉन-हॉजकिन लिम्फोमा, हॉजकिन लिम्फोमा, कार्सिनॉइड ट्यूमर, ल्युकेमिया, बोन कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर, किडनी कॅन्सर, मेसोथेलिओमा, जर्म सेल ट्यूमर आणि मेड्युलरी थायरॉईड कॅन्सर यांचा समावेश आहे.

जर रात्री वारंवार घाम येऊन झोप मोडत असेल, त्यासोबत ताप, खोकला किंवा जुलाब होत असतील, किंवा वजन कारणाशिवाय कमी होत असेल, तर हे संकेत दुर्लक्षित करू नका. तात्काळ वैद्यकीय सल्ला घेणे हेच सुरक्षित पाऊल ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Shooting Case: टायगरवरील गोळीबार प्रकरण; मास्टरमाईंड अनिल पंडितच्या भावजयीला अटक, आरोपींची संख्या १३ वर

MLC Election: भाजपमध्ये गेलेल्या २ अपक्ष नेत्यांची आमदारकी जाणार; काय आहे नियम? PK च्या पक्षाकडून तक्रारीनंतर चर्चेला उधाण

Weight Loss Diet Tips: वजन कमी करण्यासाठी काय खावे आणि काय टाळावे जाणून घ्या

‘५०० कोटीनंतर आणखी ४ बॉम्ब टाकणार’; अनेकांची नावं उघड करणार,मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

5 Crispy Chakli Recipe For Diwali: दिवाळीसाठी बनवा ५ प्रकारच्या खमंग आणि कुरकुरीत चकल्या! वाचा सोप्या रेसिपीज

SCROLL FOR NEXT