New Year Resolution Plan 2024 saam Tv
लाईफस्टाईल

New Year Resolution Plan 2024 : मानसिक आरोग्य कसे ठेवाल निरोगी! नवीन वर्षात असे जपा स्वत:ला

Mental Health Care : बदलेल्या जीवनशैलीनुसार कामाचा व्याप आणखी वाढला, त्याचा परिणाम हा मानसिक आरोग्यावर पाहायला मिळाला. जर तुम्हालाही नवीन वर्षात काही सकारात्मक बदल घडवायचे असतील तर नवीन वर्षाच्या रिझोल्यूशनमध्ये मेंटल हेल्थ कशी निरोगी ठेवाल हे जाणून घेऊया.

कोमल दामुद्रे

Mental Health Resolution :

नवीन वर्षात आपण अशा अनेक गोष्टी ठरवतो. ज्या वर्षभरात पूर्ण करायच्या असतात. डिसेंबर महिना सुरु झाला की, आपल्याला वेध लागतात नवीन वर्षाचे. नवीन वर्षाची चाहूल लागण्यापूर्वीच आपण आपली बकेट लिस्ट तयार करतो. त्यात आपण अनेक नवीन संकल्पनांचा देखील समावेश करतो.

जर तुम्ही देखील नवीन वर्षाची बकेट लिस्ट तयार करत असाल तर आरोग्य हे देखील त्यात नक्की अॅड करा. २०२३ च्या सर्चिंग लिस्टमध्ये मानसिक आरोग्याविषयी अधिक प्रमाणात माहिती मिळवण्यात आली.

बदलेल्या जीवनशैलीनुसार कामाचा व्याप आणखी वाढला, त्याचा परिणाम हा मानसिक आरोग्यावर (Mental Health) पाहायला मिळाला. जर तुम्हालाही नवीन वर्षात काही सकारात्मक बदल घडवायचे असतील तर नवीन वर्षाच्या रिझोल्यूशनमध्ये मेंटल हेल्थ कशी निरोगी ठेवाल हे जाणून घेऊया.

मानसिक आरोग्याचा संकल्प काय असावा?

आपल्या सर्वांना जीवनात सकारात्मक आणि परिणामकारक बदल घडवायचे असतील तर काही गोष्टींची काळजी (Care) घ्यावी लागेल. यासाठी तुम्ही पूर्ण करु शकाल असे ध्येय सेट करा. मानसिक आरोग्य कसे नीट राखाल पाहूया

1. स्वत:ला वेळ द्या

नवीन वर्षात, काही सेल्फ-केअर अ‍ॅक्टिव्हिटी करा ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल आणि त्यांना तुमच्या दैनंदिन दिनचर्येचा एक भाग बनवा. डान्स, चित्रकला, पुस्तक वाचणे किंवा दररोज व्यायाम करा.

2. स्वत:ला प्राधान्य द्या

स्वत:ला प्राधान्य द्या. स्वत:च्या चुका शोधा, त्यातून काही नवीन शिकण्याचा प्रयत्न करा.

3. तुमच्या झोपेला प्राधान्य द्या

झोपेचा आणि मानसिक आरोग्याचा चांगला संबंध आहे. खरेतर, सुमारे 65 ते 90% नीट झोपत नाही, सतत चिंतेत असतात. नवीन वर्षापासून दररोज रात्री थोडे लवकर झोपण्याचा प्रयत्न करा.

4. तुमचा स्क्रीन वेळ मर्यादित करा

तुमचा फोन किंवा संगणकावर जास्त वेळ घालवल्याने तुमच्या झोपेची गुणवत्ता खराब होऊ शकते. तुमच्या नातेसंबंधांवरही (Relation) परिणाम होऊ शकतो आणि नैराश्य आणि चिंतेची भावना निर्माण होऊ शकते

5. मानसिक आरोग्य

तुमचे मानसिक आरोग्य सुधारण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे ते समजून घेणे. मानसिक आरोग्याविषयी माहिती देणारी ऑनलाइन संसाधने उपलब्ध आहेत. तुम्ही मेंटल हेल्थ फर्स्ट एडचा कोर्सही करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

खिशात पैसा टिकणार, व्यवसायात नफा होणार; 5 राशींच्या लोकांसाठी शनिवार गेमचेंजर ठरणार

Onion: व्यापाऱ्यांचा कांदा खरेदीस नकार, कांदा उत्पादकांचं टेन्शन वाढलं

Diesel Crisis: 7/12 शिवाय डिझेल नाही, सरकारची जाचक अट; शेतकऱ्यांचा संताप

Imran Khan: इम्रान खानची पत्नी रिलेशनशिपमध्ये, जेमिमा अब्जाधीश गुंतवणूकदारासोबत बांधणार लग्नगाठ

Fact Check : आता सर्वांना मिळणार 7500 रुपये पेंशन? सरकारकडून निवृत्तीवेतनात भरमसाठ वाढ?

SCROLL FOR NEXT