New Year 2024 Rashifal Saam Tv
लाईफस्टाईल

New Year 2024 Rashifal : नवीन वर्षात ३ राशींचे उजळेल भाग्य, वर्षभर पडेल पैशांचा पाऊस; आरोग्याची काळजी घ्या

New Year Horoscope 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात ४ मोठ्या ग्रहांचे संक्रमण होणार आहे. २०२४ चा पहिला महिना हा अधिक खास असणार आहे. ग्रहांच्या संक्रमणामुळे १२ राशींवर शुभ-अशुभ परिणाम पाहायला मिळेल.

कोमल दामुद्रे

New Year Rashibhavishya In Marathi :

नववर्षाभिनंदन! ज्योतिषशास्त्रानुसार नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात ४ मोठ्या ग्रहांचे संक्रमण होणार आहे. २०२४ चा पहिला महिना हा अधिक खास असणार आहे. ग्रहांच्या संक्रमणामुळे १२ राशींवर शुभ-अशुभ परिणाम पाहायला मिळेल.

हे वर्ष सर्व राशींसाठी संमिश्र परिणाम देणार आहे. २०२४ ची एकूण बेरीज ही ८ आहे. जी शनीची संख्या आहे. नवीन वर्ष २०२४ मध्ये शनि आणि मंगळाचा प्रभाव असेल. यंदा अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. हे वर्ष तीन राशींसाठी अधिक शुभ ठरणार आहे जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर

1. मेष

नवीन वर्ष तुमच्यासाठी यशाने (Success) भरलेले असेल. सुरुवातीच्या काळात आरोग्याच्या समस्या जाणवतील. आर्थिकबाबतीत हे वर्ष अधिक फायदेशीर (Benefits) ठरेल. या वर्षी मालमत्ता आणि वाहन खरेदी करण्यचा योग आहे. नवीन नोकरी मिळेल.

2. वृषभ

या वर्षी कामात अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. आरोग्याची काळजी घ्याल. कान, नाक, घशासंबंधित आजार उद्भवू शकतात. आर्थिक स्थिती मध्यम राहील. करिअरमधील (Career) परिस्थिती हळूहळू सुधारेल. मेहनतीचे फळ मिळेल. प्रेमसंबंधात अडचणी येतील.

3. मिथुन

या वर्षी जीवनात संमिश्र परिणाम पाहायला मिळतील. आरोग्याकडे लक्ष द्याल. कोलेस्टेरॉल, यकृत आणि हृदयाचे आजार होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती चांगली असेल. मालमत्तेशी संबंधित समस्यांपासून आराम मिळेल. पदोन्नती व उच्च पद मिळेल.

4. कर्क

आयुष्यात मोठे बदल होतील. आरोग्याच्यादृष्टीने हे वर्ष थोडे काळजी करण्यासारखे असणार आहे. डोळ्यांच्या समस्या उद्भवतील. आर्थिक स्थितीत काही चढउतार पाहायला मिळतील. पैसे येतील पण अनपेक्षित खर्च वाढेल. करिअरमध्ये सुधारणा होईल.

5. सिंह

हे वर्ष आरोग्याच्या दृष्टीने मध्यम राहिल. रक्तदाबाची काळजी घेतली पाहिजे. पैशाच्या बाबतीत हे वर्ष समाधानकारक राहील. आर्थिक आणि व्यवसायात स्थिरता राहील. नोकरी बदलू शकतात. वैवाहिक नात्याची काळजी घ्याल.

6. कन्या

आरोग्यात अधिक सुधारणा होईल. या वर्षी लाभदायक परिस्थिती उद्भवेल. आर्थिक स्थिती सुधारेल. मालमत्तेतून लाभ होईल. वर्षाची सुरुवात चांगल्या करिअरने होईल. नोकरी आणि व्यवसाय दोन्ही चांगले राहातील.

7. तूळ

यंदाच्या वर्षात अनेक चढ-उतार पाहायला मिळतात. या वर्षी आरोग्याच्या मोठ्या समस्या उद्भवू शकतात. पोट, यकृताच्या समस्या उद्भवू शकतात. आर्थिक स्थिती मध्यम राहील. पैसा नक्कीच येईल. नोकरी-व्यवसायात काही अडचणी येतील.

8. वृश्चिक

दुखापतीसारख्या अनेक परिस्थिती उद्भवतील. पैशांच्या बाबतीत चढ-उतार पाहायला मिळतील. पैशांची चणचण भासेल. नोकरी सोडण्याची रिस्क घेऊ नका. नातेसंबंधाची काळजी घ्यावी

9. धनु

जीवनात मोठे आणि लाभदायक बदल होतील. आरोग्याची स्थिती सुधारेल. मानसिक चिंता आणि नैराश्यातून जाल. आर्थिक बाजू सुधारेल. पैसे अडकण्याची किंवा गहाळ होण्यची शक्यता आहे.

10. मकर

आरोग्य ठिकठाक राहिल. आर्थिक परिस्थिती ठीक राहील. कर्जाच्या समस्यांपासून तुम्हाला आराम मिळेल. वर्षाच्या सुरुवातीला नोकरीत मोठे फायदेशीर बदल होतील. जबाबदारी वाढेल.

11. कुंभ

आरोग्याबाबत चढ-उतार पाहायला मिळतील. चिंता आणि तणावामुळे अडचणी येतील. आर्थिक स्थिती मध्यम राहील. करिअरचे नियोजन कराल. नोकरीत अचानक बदल होतील.

12. मीन

या वर्षात रखडलेली कामे पूर्ण होतील. आरोग्य संमिश्र राहिल. आरोग्याच्या कोणत्याही समस्येकडे दुर्लक्ष करु नका. आर्थिक स्थिती चांगली राहिल. कर्जाच्या समस्येतून दिलासा मिळेल.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

Pune Traffic : पुण्यातील वाहतूक कोंडी फुटणार, ३ राष्ट्रीय महामार्गांवरील उपाययोजना ठरतील रामबाण

Tiger Attack : गुरांना चारा घेण्यासाठी गेले असता वाघाचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, आठवड्याभरातील दुसरी घटना

Raksha Bandhan 2025: भावाला चांदीची राखी बांधल्याने काय फायदे होतात?

Sangali : यंदा नागपंचमीला शिरळकरांना जिवंत नागाचे दर्शन | VIDEO

SCROLL FOR NEXT