2022 वर 'कालसर्प योगा'चं सावट Saam Tv
लाईफस्टाईल

New Year 2022 : 2022 वर 'कालसर्प योगा'चं सावट, 4 राशींच्या आयुष्यात खळबळ उडण्याची भीती

2022 च्या कुंडलीत तयार होत असलेला कालसर्प योग चार राशींसाठी अडचण आणू शकते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : वर्ष 2022 हे काही जणांसाठी अत्यंत शुभ असणार आहे. तर काही राशींसाठी हे थोडंफार कठीणही ठरु शकते. 2022 च्या कुंडलीत तयार होत असलेला कालसर्प योग चार राशींसाठी अडचण आणू शकते. त्या रास कोणत्या जाणून घेऊया (New Year 2022 kundali Kaal sarp yog will impact these 4 zodiac signs) -

वृषभ

वृषभ राशीच्या (Zodiac) लोकांसाठी 2022 चा कालसर्प अडचणी आणू शकतो. विशेषत: पहिल्या 3 महिन्यांत काळजी घेणे आवश्यक आहे. यामुळे या राशीच्या व्यक्तीच्या आईला आरोग्यासंबंधी त्रास होऊ शकतो. याशिवाय, त्यांच्यासोबत चोरी किंवा फसवणूकही होऊ शकते, त्यामुळे काळजी घ्यावी.

हेही वाचा -

कन्या

ही परिस्थिती कन्या राशीच्या लोकांसाठी अंशतः विष योग बनवत आहे. बाहेरच्या गोष्टी कमी खाव्या. 24 एप्रिल 2022 पर्यंत खाण्यापिण्याची काळजी घ्यावी. जर तुम्हाला कुठले व्यसन असेल, तर अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांना भावनिक त्रास होऊ शकतो. इतरांच्या विचारांना तुमच्यावर हावी होऊ देऊ नका, अन्यथा तुम्ही तणावात जाऊ शकता. विशेषत: 24 एप्रिल 2022 पर्यंतचा काळ या बाबतीत अधिक कठीण असेल.

मीन

हा काळ मीन राशीच्या लोकांना काहीतरी वेगळा अनुभव देईल. तुमचा सामना एखाद्या व्यक्तीशी होईल जो तुमच्यासाठी धक्कादायक अनुभव ठरेल. कुणापासून दुरावल्याचे दु:खहगी असेल. या काळात संयम बाळगणे गरजेचे आहे.

हा काळ अडचणी आणेल, तणाव वाढवेल. अशा परिस्थितीत शिव-पंचाक्षर स्तोत्राचे नियमित पठण केल्यास या स्थितीला सामोरे जाण्याची ताकद मिळेल. तसेच लवंग कापूर-तुपासह लाल चंदन, अपमार्ग आणि दारूहळदीची धुणी घरभर केल्याने जीवनातील नकारात्मकता कमी होईल.

(टीप - यथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसाधारण धार्मिक मान्यता आणि माहितीच्या आधारे देण्यात आली आहे. याचं कुठलंही वैज्ञानिक कारण नाही. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांना सल्ला घ्या...)

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राज्यात शंभर टक्के पीक पाहणी होणार, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

Mhada Home: म्हाडाचे घर असणाऱ्यांसाठी मोठी बातमी! सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत | VIDEO

ST Bus : पुणे-मुंबई प्रवास महागला, एसटीच्या तिकिटात वाढ, पाहा कोणत्या शहराला जायला किती तिकिट? |VIDEO

Kendra Yog 2025: उद्या म्हणजेच दसऱ्याला 'या' राशींना मिळणार नशीबाची साथ; गुरु-बुध बनवणार पॉवरफुल योग

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींमुळे ३६१ आमदारांचा निधी रखडला; सरकारी तिजोरीवर ताण; VIDEO

SCROLL FOR NEXT