अपघात रोखण्यासाठी केंद्र सरकारचा कडक निर्णय
वाहतुकीचे नियम मोडल्यास थेट वाहन जप्तीची कारवाई
बेदरकार वाहन चालकांवर कठोर कारवाई होणार
वाहतुकीचे कितीही कडक नियम केले तरी ते राजरोसपणे मोडले जातात. आणि यामुळेच काळीज हेलावून टाकणारे अनेक अपघात तर होतातच मात्र दर वर्षी देशात लाखो लोकांचे बळी जातात. आता याच बेलगाम वाहन चालकांना चाप लावण्यासाठी केंद्र सरकार अँक्शन मोडमध्ये आलंय. तुम्ही जर गाडी चालवत असाल तर हा नियम तुमच्यासाठी देखील आहे. हा नवा नियम वाहतूकीचे नियम पायदळी तुडवणाऱ्यांना कार ऐवजी पायपीट करायला लावणाराये. असा नेमका काय नियम करण्यात आलाय पाहा.
केंद्रीय मोटार वाहन कायदा 1989 मध्ये बदल
वर्षभरात 5 वेळा नियम मोडला तर कठोर कारवाई
गाडीचं रजिस्ट्रेशन रद्द करण्यात येणार
ड्रायव्हिंग लायसन्स कायमचे रद्द होणार
वर्षभरात 5 वेळा नियम मोडल्यास वाहन चालवण्यास बंदी
देशात 2024 मध्ये अपघातांमुळे १ लाख 77 हजार लोकांनना जीव गमवावा लागला. दंडाच्या रकमा वाढवूनही अपघात २०२३ च्या तुलनेत २०२४ मधील अपघातांच्या संख्येत वाढ झाली. त्यामुळे सरकारने आता थेट वाहनचालकांवरच कारवाईचा बडगा उगारलाय. तुम्ही देखिल आता वाहन चालवत असाल तर काळजी घ्या. वाहतुकीचे नियम पाळा अन्यथा तुम्ही गाडीला मुकाल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.