Smartphone Battery Issue Saam Tv
लाईफस्टाईल

नवीन Smartphone ची Battery सतत ड्रेन होते? या टीप्स लक्षात ठेवा, चार्ज करायची गरज पडणार नाही

कोमल दामुद्रे

Battery Drain Issue :

सध्याच्या जगात स्मार्टफोनशिवाय हल्ली कोणाचही पान हलत नाही. स्मार्टफोनही आजची सर्वात मोठी गरज बनली आहे. दिवसाच्या सुरुवातीपासून ते रात्री झोपेपर्यंत अनेकांच्या हातात फोन पाहायला मिळतो.

इतकेच नाही तर वाढत्या तंत्रज्ञानामुळे स्मार्टफोनचे अनेक नवे ब्रॅण्डही आपल्याला पाहायला मिळतात. ज्याचे क्रेझ अनेकांमध्ये वाढताना दिसून येत आहे. परंतु, जर तुम्ही नुकताच नवीन फोन घेतला असेल आणि त्याची बॅटरा ड्रेन होत असेल तर टेन्शन घेऊ नका. आपण अशा अनेक चुका करतो ज्यामुळे स्मार्टफोनची बॅटरी लगेच ड्रेन होते. अशावेळी काय करायला हवे. ज्यामुळे तुमच्या फोनचा (Phone) बॅटरी बॅकअप वाढवू शकता. या टीप्स (Tips) लक्षात ठेवा.

1. चार्जिंग

फोन चार्जिंगला लावून अनेकांना तो वापरण्याची सवय असते. त्यावर गेमिंग (Game), व्हिडिओ स्ट्रीमिंग, चॅटिंग, व्हिडिओ कॉलिंग यांसारख्या गोष्टी करतात. त्यामुळे चार्जिंग करताना फोन वापरल्याने बॅटरीवर जास्त दबाव येतो. जर तुम्हालाही चांगला बॅटरी बॅकअप हवा असेल तर चार्जिंग करताना कधीही फोन वापरु नका.

2. बॅटरी

बरेचदा फोन वापरताना बॅटरी १ ते २ टक्के शिल्लक असताना किंवा ती पूर्णपणे संपलेली असताना आपण फोन चार्जिंगला लावतो. यामुळे स्मार्टफोन खराब होऊ शकतो. फोनची बॅटरी जवळपास २५ टक्के असायला हवी. यामुळे बॅटरी चांगली काम करते.

3. १०० टक्के चार्ज नको

अनेकदा स्मार्टफोन चार्ज करताना तो १०० टक्के चार्ज केला जातो. परंतु, असे केल्याने बॅटरीवर परिणाम होतो. त्यासाठी फोन ८० ते ९० टक्के चार्ज झाल्यानंतर लगेच काढून टाका.

4. बॅटरी सेव्ह मोड

फोनची बॅटरी कमी असेल तर बॅटरी सेव्ह मोड वापरा. जर तुम्ही बॅटरी सेव्हर मोड वापरत असाल तर स्मार्टफोनसाठी आवश्यक ते काम करते. ज्यामुळे बॅटरीचा वापर कमी होतो. बॅटरीवर अतिरिक्त दबाव पडत नाही.

5. स्मार्टफोन अपडेट ठेवा

अनेकदा आपण स्मार्टफोनच्या अपडेटकडे दुर्लक्ष करतो. ज्यामुळे फोनची बॅटरी झपाट्याने खराब होते. सॉफ्टवेअर अपडेटचे नोटिफिकेशन आल्यानंतर तो लगेच अपडेट करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : पुण्यात भरधाव वेगात असलेल्या डंपरने घेतला तरुणीचा जीव

Trend Shoes In India: शूजच्या या टॉप ब्रँडनी भारतीयांना घातलेय भूरळ, सध्या खूपच आहेत ट्रेंडिंगमध्ये

Ajit Pawar : भाऊबीजेची ओवाळणी मिळेल, पण लाडक्या भावाला विसरू नका; अजित पवार असं का म्हणाले?

Marathi Sahitya Samelan : मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी तारा भवाळकर

Chandrapur News : अवैध धंदे रोखण्यासाठी चकपिरंजी ग्रामसभेत अनोखा ठराव; शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी टाकली अट

SCROLL FOR NEXT