WhatsApp Saam Tv
लाईफस्टाईल

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमीनसाठी येतंय नवीन फीचर, मिळणार 'ही' मोठी सुविधा

व्हॉट्सअॅप हे सतत अपडेट होत असलेले प्लॅटफॉर्म आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

व्हॉट्सअॅप हे सतत अपडेट होत असलेले प्लॅटफॉर्म आहे. आता ग्रुप यूजर्ससाठी या प्लॅटफॉर्मवर नवीन अपडेट येणार आहे. या नव्या फीचर्समुळे युजर्सना अधिक सुविधा मिळणार आहेत. आता एका लिंकच्या मदतीने, अनेक लोक समाविष्ट केले जातात, परंतु काहीवेळा अनावश्यक लोक देखील या ग्रुपमध्ये ऍड होतात, ज्यामुळे केवळ लोकांची संख्या वाढते. पण त्यांचा ग्रुपमध्ये काही उपयोग नसतो.

या नवीन फीचरद्वारे, काही अप्रूवल फीचर्स मिळणार आहेत. हे ऑन केल्यानंतर, जर तुम्ही लिंकद्वारे ग्रुपमध्ये सामील होत असाल तर त्यासाठी अॅडमिनची परवानगी घ्यावी लागेल. त्यामुळे आता ग्रुप अॅडमिन ठरवणार की, कोणाला ग्रुपमध्ये येऊ द्यायचे कोणाला नाही.

सध्या टेस्टिंगमध्ये हे फिचर;

व्हॉट्सअॅपचे अपकमिंग फीचर्स ट्रॅक घेणाऱ्या Wabita Info या वेबसाइटने या फीचरची माहिती दिली आहे. या अहवालात असे सांगण्यात आले आहे की बीटा व्हर्जन अंतर्गत लिमिटेड युजर्स हे फिचर वापरण्यास सक्षम आहेत. सर्व टेस्टिंग पूर्ण झाल्यानंतर याचे स्टेबल व्हर्जन लाँच केले जाईल. तर, हे Android आणि iOS दोन्हीवर काम करेल.

मॅन्युअली चालू करणे आवश्यक;

अॅडमिन अप्रूव्हल फीचर्स मिळवण्यासाठी अॅडमिनला ग्रुपच्या सेटिंग्जमध्ये जाऊन मॅन्युअली फीचर्स सुरू करावी लागतात. ते प्रथम डिफॉल्ट बंद असेल, नंतर ते फक्त ऑन कराव लागेल, तेव्हा तिथे group membership approval लिहिलेले असेल.

हे देखील पाहा-

ग्रुप मेंबर्सची परमिशन लागेल का?

ग्रुपमध्ये काही बदल झाल्यास त्याचा अलर्ट ग्रुपमधील सध्याच्या मेम्बर्सकडे लगेच पोहोचेल. मात्र, अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, या फीचरसाठी ग्रुपच्या सध्याच्या युजर्सची परवानगी घ्यावी लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navi Mumbai : गटाराच्या पाण्यात महिलेने धुतली भाजी, नवी मुंबईतील प्रकार; किळसवाणा Video Viral

Ayushman Bharat Scheme: उपचार करायचाय? पण आयुष्मान कार्ड हरवलंय, तर कसा होणार मोफत उपचार? काय आहे नियम

Maharashtra Rain Live News : - सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या

Heavy Rain : मुसळधार पावसाचा हाहाकार; कल्याण- डोंबिवलीतील सखल भागात पाणी, जनजीवन विस्कळीत PHOTO

Solapur Shocking: माझ्या अंगावर गाडी का घातली? बस थांबवत पैलवानानं एसटी चालकाची गचांडी पकडली | Video Viral

SCROLL FOR NEXT