New Cancer Treatment Research saam tv
लाईफस्टाईल

Cancer Treatment: कॅन्सरच्या उपचारांवर नवं संशोधन; अ‍ॅस्पिरीन रोखू शकणार कॅन्सरच्या गाठीची शरीरातील वाढ

New Cancer Treatment Research : स्वस्त आणि सहज उपलब्ध होणारी वेदनाशामक अ‍ॅस्पिरिन कॅन्सरचा प्रसार रोखण्यास मदत करू शकते, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

कॅन्सरसारखा गंभीर आजार झाला की अनेकांच्या पायाखालची जमीन सरकते. या आजाराला रोखण्यासाठी तज्ज्ञ सातत्याने नवं संशोधन करतायत. एका नवीन संशोधनामुळे कॅन्सरच्या रुग्णांसाठी आशेचा किरण निर्माण झाला आहे. स्वस्त आणि सहज उपलब्ध होणारी वेदनाशामक अ‍ॅस्पिरिन कॅन्सरचा प्रसार रोखण्यास मदत करू शकते, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

केंब्रिज युनिवर्सिटीतीस शास्त्रज्ञांना त्यांच्या अभ्यासात असं आढळून आलंय की, एस्पिरिन शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करून कॅन्सरशी लढण्यास मदत करते. दरम्यान डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय अ‍ॅस्पिरिन घेणं टाळण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

कसं काम करते एस्पिरीन?

संशोधकांना असं आढळून आलं की, ज्यावेळी कॅन्सरच्या पेशी मुख्य ट्यूमरपासून वेगळ्या होतात. त्यावेळी शरीराच्या इतर भागात पसरण्याचा प्रयत्न करतात तेव्हा अ‍ॅस्पिरिन ही प्रक्रिया रोखण्यास मदत करते. मेटास्टेसिस म्हणजे जेव्हा कॅन्सर शरीराच्या इतर भागात पसरतो तेव्हा तो धोकादायक ठरतो आणि मृत्यूचा धोका संभवतो.

शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये असलेल्या एका विशेष प्रकारच्या पांढऱ्या रक्तपेशी, ज्याला टी-सेल म्हणतात त्या कॅन्सरच्या पेशी ओळखू शकतात. याशिवाय त्या पेशी नष्टही करू शकतात. परंतु, रक्तातील प्लेटलेट्स या टी-पेशींचं काम रोखतात. अ‍ॅस्पिरिन प्लेटलेट्स निष्क्रिय करतात ज्यामुळे टी-पेशी कॅन्सरच्या पेशी ओळखण्यास आणि नष्ट करण्यास अधिक सहजपणे सक्षम होतात.

प्राध्यापक राहुल रॉय चौधरी यांच्या मते, अ‍ॅस्पिरिन कॅन्सरविरुद्ध रोगप्रतिकारक शक्ती वाढवून काम करतं आणि मेटास्टेसिस रोखण्यास मदत करते.

सगळ्या रूग्णांसाठी फायदेशीर?

मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अ‍ॅस्पिरिन घेणं धोकादायक ठरू शकतं, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. अ‍ॅस्पिरिनचं जास्त प्रमाणात सेवन केल्याने अंतर्गत रक्तस्त्राव आणि स्ट्रोक सारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. लंडनच्या क्वीन मेरी विद्यापीठाचे प्राध्यापक मंगेश थोराट यांनी सांगितलं की, या अभ्यासामुळे एक महत्त्वाचा दुवा जोडला गेला असून काही प्रश्नांची उत्तर सापडणं कठीण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT