Flight Travel Rule Saam Tv
लाईफस्टाईल

Flight Travel Tips: विमानाने प्रवास करताय? तर हे कपडे कधीच घालू नका; जाणून घ्या कारणं

Clothing Tips For Flight : विमान प्रवास करतानाही काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Never Wear These Clothes In Flight :

सध्या सर्वांचेच आयुष्य खूप जास्त धावपळीचे असते. सर्वांनाच प्रवासाचा वेळ वाचवायचा असतो. खूप लांबचा पल्ला अगदी काही वेळात पूर्ण करायचा असतो. यासाठी बहुतेक लोक विमानाचा प्रवास निवडतात. परंतु विमान प्रवास करतानाही काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

विमान प्रवासात सूचना किंवा काही गोष्टी समजावून सांगण्यासाठी सल्लागार असतात. परंतु काही गोष्टींची काळजी घेणे हे प्रवाशांच्या हातात असते. विमान प्रवासात कोणते कपडे घालावेत किंवा घालू नये. तर कोणते सामान घेऊन जावे कोणते नाही याबाबतही संभ्रम असतो. त्याबाबत माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

विमान प्रवासात हे कपडे आजिबात घालू नका

टॉमी सायमाटे या फ्लाइट अटेंडंटने टिकटॉकवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात तिने विमानातील काही गोष्टी समजावून सांगितल्या आहेत. विमान प्रवास करताना शॉर्ट्स किंवा स्कर्ट कधीही घालू नये. तुम्हाला असे वाटत असेल की, हे कपडे खूप जास्त कम्फर्टेबल आहेत. परंतु हे कपडे घालण्यास मनाई आहे.

तिने सांगितले की, फ्लाइटची सीट किती स्वच्छ किंवा घाण असते. हे तुम्हाला माहित नसते. अशा परिस्थिती तुम्ही संपूर्ण कपडे परिधान करावेत. जेणेकरुन तुमच्यावर जंतूचा कमीतकमी परिणाम होईल. त्याचबरोबर फ्लाइटच्या खिडकीवर उभे राहू नये कारण बरेच लोक त्यांच्या हातांनी स्पर्श करतात. त्यामुळे त्यांचे आजार कदाचित तुम्हालाही होऊ शकतात. त्यामुळे या सर्व गोष्टींची काळजी घ्यावी.

या गोष्टी लक्षात ठेवा

क्रू मेंबरने विमानात काळजी घेण्याबाबत ५ गोष्टी सांगितल्या आहेत. यामुळे तुमचा विमान प्रवासातील धोका कमी होईल. यात शॉर्ट्स किंवा स्कर्ट घालू नये. खिडकीवर हात ठेवू नये. तसेच टॉयलेटमध्ये फ्लश बटण आणि लिवर बटणला स्पर्श करु नका. नेहमी टिश्यू पेपर वापरा. ट्रॅकसूट घालून जाण्याचा प्रयत्न करा. जेणेकरुन विमानात कोणत्याही व्यक्तीसोबत डायरेक्ट संबंध येणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आज राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र; तब्बल १९ वर्षानंतर एकत्र

Saturday Horoscope : मोठी स्वप्न पूर्ण होतील, दिवस चांगला जाणार; ५ राशींच्या लोकांचं नशीब उजळणार

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

SCROLL FOR NEXT