Things to keep on top of fridge saam tv
लाईफस्टाईल

Vastu Tips: फ्रिजच्या वर चुकूनही ठेवू नका 'या' वस्तू; घरात सुख-समृद्धी टिकवण्यासाठी वास्तूचे हे नियम नक्की पाळा

Things to keep on top of fridge: वास्तुशास्त्रानुसार फ्रिजच्या वर तांब्याचे भांडे, बांबूचे रोप आणि कासवाची मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते. या वस्तूंचे पारंपरिक महत्त्व, फ्रिजच्या वर कोणत्या वस्तू ठेवणे टाळावे आणि घराची ही जागा स्वच्छ व नीटनेटकी ठेवण्याचे महत्त्व जाणून घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

घर स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवणं गरजेचं असतं. त्याचबरोबर वास्तुशास्त्रात घरातील वस्तू योग्य ठिकाणी ठेवण्यालाही महत्त्व दिलं जातं. अनेक घरांमध्ये फ्रिजच्या वर चाव्या, औषधं, डबे आणि इतर वस्तू ठेवल्या जातात. मात्र वास्तुशास्त्रानुसार, फ्रिजच्या वरची जागा स्वच्छ आणि नीटनेटकी ठेवणं चांगलं मानलं जातं. या जागेवर काही शुभ वस्तू ठेवल्याने घरात सुख-समृद्धी येते आणि आर्थिक प्रगती होते, अशी मान्यता आहे. मग फ्रिजच्या वर कोणत्या वस्तू ठेवाव्यात आणि कोणत्या वस्तू ठेवणं टाळावं? जाणून घेऊया.

फ्रिजच्या वर सामान ठेवणं टाळा

अनेक घरांमध्ये फ्रिजच्या वरची जागा मोकळी असल्यामुळे तिथे चाव्या, औषधं, डबं आणि इतर नको असलेल्या वस्तू ठेवल्या जातात. मात्र वास्तुशास्त्रात ही जागा महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे फ्रिजच्या वर अनावश्यक सामान ठेवण्याऐवजी ती जागा स्वच्छ आणि नीटनेटकी ठेवण्याचा सल्ला दिला जातो. असं केल्याने घरातील वातावरण सकारात्मक राहते, अशी वास्तुशास्त्रात मान्यता आहे.

फ्रिजच्या वर तांब्याचं भांडं ठेवणं शुभ

फ्रिजच्या वर एखादी शुभ वस्तू ठेवायची असेल तर तांब्याचा छोटा कलश किंवा भांडं ठेवता येतं. या भांड्यात स्वच्छ पाणी भरून ठेवण्याचीही परंपरा आहे. वास्तुशास्त्रानुसार, तांब्याला विशेष महत्त्व आहे. तांब्याचं भांडं ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि कुटुंबात शांतता व समृद्धी नांदते, अशी मान्यता आहे.

बांबूचं रोप ठेवण्याचं महत्त्व

वास्तुशास्त्र आणि फेंगशुई या दोन्हींमध्ये बांबूच्या रोपाला शुभ मानलं जातं. हे रोप फ्रिजच्या वर ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते. याशिवाय बांबूचं रोप सुख, प्रगती आणि चांगलं निर्णय घेण्याच्या क्षमतेशी जोडलं जातं. त्यामुळे अनेक जण घरात बांबूचं रोप ठेवण्यास पसंती देतात.

कासवाला मानलं जातं समृद्धीचं प्रतीक

वास्तुशास्त्रानुसार, पितळ किंवा काचेपासून बनवलेलं कासव शुभ मानलं जातं. कासव हे स्थिरता, सुरक्षा आणि धन-संपत्तीचं प्रतीक असल्याची मान्यता आहे. सनातन धर्मातील ग्रंथांमध्येही कासवाला विशेष महत्त्व दिलेत. त्यामुळे घरात सकारात्मक वातावरण टिकून राहावं आणि सुख-समृद्धी यावी यासाठी अनेक जण कासवाची मूर्ती योग्य ठिकाणी ठेवतात.

फ्रिजच्या वर कोणत्या वस्तू ठेवू नयेत?

वास्तुशास्त्रानुसार, फ्रिजच्या वर तुटलेल्या वस्तू, जुने कागद, औषधं आणि वापरात नसलेले सामान ठेवणं टाळावं. अशा वस्तूंमुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते अशी मान्यता आहे. त्यामुळे फ्रिजच्या वरची जागा शक्यतो मोकळी, स्वच्छ आणि नीटनेटकी ठेवावी. या जागेवर वस्तू ठेवायच्याच असतील, तर शुभ मानल्या जाणाऱ्या वस्तू ठेवण्याचा सल्ला दिला जातो.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाहीतर पाप लागेल! पुण्यात मतपेटीत आढळल्या २ चिठ्ठ्या; नेमकं काय लिहिलंय? VIDEO

Maharashtra Vidhan Parishad Election Result Live: नागपूर पदवीधर मतदारसंघात विजयाचा विश्वास; नितेश कराळे मास्तरांचा दावा

Political News : २१ लाख फॉलोअर्स, पण निवडणुकीत मतं पडली फक्त ३३! सोशल मीडिया स्टार उमेदवाराची चर्चा

Travel Tips : हॉटेलमधून चेक-आउट करताय? निघण्यापूर्वी ही ६ महत्त्वाची कामे कधीही विसरू नका

Ration Card Update: तुमचे रेशन कार्ड सुरू आहे की बंद, कसं तपासाल? वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

SCROLL FOR NEXT