Price Hike Saam Tv
लाईफस्टाईल

Price Hike : मनोरंजनाला लागणार ब्रेक! Netflix च्या किमतीत वाढ, पाहा नवे दर

Netflix Price Hike : नेटफ्लिक्सवर येणाऱ्या वेब सिरीज आणि चित्रपटांमधील हॉलिवूड कलाकारांनी काही महिन्यांपूर्वी संप पुकारला होता.

Shraddha Thik

OTT Platform Price Hike :

नेटफ्लिक्सवर येणाऱ्या वेब सिरीज आणि चित्रपटांमधील हॉलिवूड कलाकारांनी काही महिन्यांपूर्वी संप पुकारला होता. तसेच हा संप बऱ्याच काळापासून सुरू होता आणि आता तो थांबवण्यात आला आहे.

हा संप AI मुळे पुकारण्यात आला होता, आणि कलाकारांना त्यांची नोकरी धोक्यात आहे असे वाटत होते. म्हणून आता नेटफ्लिक्स (Netflix) हे जाहिरात-मुक्त सेवेची किंमत वाढवण्याची योजना आखत आहे. देशातील सर्वात मोठ्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने किंमत वाढवण्याची ही दुसरी वेळ आहे.

नेटफ्लिक्स जागतिक स्तरावर अनेक बाजारपेठांमध्ये स्ट्रीमिंग सेवेची किमती वाढवण्याबद्दल चर्चा करत आहे. परंतु त्याची सुरुवात युनायटेड स्टेट्स आणि कॅनडापासून होऊ शकते. यानंतर भारतासह इतर बाजारपेठांमध्ये याचे दर आखेल.

नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन प्लान

काही देशांमध्ये नेटफ्लिक्सने सबस्क्रिप्शनच्या किंमती (Cost) कमी केल्या आहेत. या महिन्यात कंपनीने पासवर्ड शेअरिंग फीचर बंद करण्याची घोषणा केली होती. Netflix ने गेल्या वर्षी आपल्या सर्व प्लानच्या किंमती वाढवल्या होत्या.

मोबाइल प्लान

हा 149 रुपयांचा मासिक प्लान आहे, जो एकाच मोबाइल (Mobile) आणि टॅबलेटवर वापरला जाऊ शकतो. यावर, SB 480 pixels वर स्ट्रीमिंग होते.

बेसिक प्लान

हा प्लान 199 रुपयांचा आहे. या प्लानमध्ये सिंगल मोबाइल, टॅबलेट, कॉम्प्युटर आणि स्मार्ट टीव्हीवर स्ट्रीमिंग करता येते. यामध्ये 720 pixelsचा दर्जा उपलब्ध आहे.

एका महिन्याचा प्लान

या प्लानसाठी तुम्हाला महिना 499 रुपये द्यावे लागतील. या प्लानमध्ये दोन उपकरणांवर स्ट्रीमिंग केले जाते. यामध्ये तुम्हाला 1080 pixels क्वालिटी मिळेल.

प्रीमियम प्लान

या प्लानसाठी तुम्हाला दरमहा 649 रुपये द्यावे लागतील. यात 4K आणि HDR व्हिडिओ स्ट्रीमिंगची सुविधा आहे.

किती वाढ होईल?

वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार, नेटफ्लिक्सचे सबस्क्रिप्शन किती वाढेल याबाबत सध्या कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. नवीन दर कधी लागू होणार याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT