C-section recovery saam tv
लाईफस्टाईल

C-section recovery: सिझेरीयननंतर दुर्लक्ष केल्यास होतील गंभीर परिणाम; नेमकी कशी घ्यावी काळजी?

C-section recovery: ऑपरेशन सी-सेक्शन प्रसूती दरम्यान केली जाणारी प्रोसेस आहे. मात्र सिझेरीयननंतर महिलांना काही प्रमाणात काळजी घेणं गरजेचं असतं. यावेळी योग्य ती काळजी कशी घ्यावी याबाबत तज्ज्ञांनी माहिती दिली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

प्रत्येक स्त्रीसाठी गर्भधारणा ही खूप खास असते. या काळात महिलेला अनेक प्रकारच्या बदलांना सामोरं जावं लागतं. यामध्ये शारीरिक, मानसिक आणि भावनिक बदल घडून येतात. या काळात महिलांची त्यांच्या आरोग्याबाबतची जबाबदारी अधिकच वाढते. साधारणपणे प्रत्येक स्त्रीला नॉर्मल डिलिव्हरी हवी असते, पण काही वेळा काही मोठ्या गुंतागुंतीमुळे महिलांना सिझेरियन डिलिव्हरी म्हणजेच सी सेक्शनकडे वळावं लागतं.

सी सेक्शन डिलीव्हरी म्हणजे काय?

ऑपरेशन सी-सेक्शन प्रसूती दरम्यान केली जाणारी प्रोसेस आहे. यानंतर बाळाला गर्भातून बाहेर काढण्यात येतं. या सर्जरीनंतर पोट आणि गर्भाशय बंद करण्यासाठी टाके घातले जातात. अशा पद्धतीच्या प्रसूतीनंतर महिलांना प्रचंड वेदानांचा त्रास सहन करावा लागतो.

यासंदर्भात स्त्रिरोगतज्ज्ञ आणि वंधत्व निवारण तज्ज्ञ डॉ. हितेंद्रसिंग राजपूत यांनी माहिती दिलीये. डॉ. राजपूत यांच्या सांगण्यांनुसार, सी सेक्शन डिलीव्हरीनंतर महिलांना अधिक काळजी घ्यावी लागते. यामध्ये नेमकी कशी काळजी घ्यायची हे जाणून घेऊया.

शस्त्रक्रियेनंतर तात्काळ कोणती काळजी घ्यावी

  • होणऱ्या वेदना, जखमा आणि औषधोपचार यासाठी डॉक्टरांच्या सूचनांचं पालन केलं पाहिजे.

  • शक्य तितकी विश्रांती घ्या आणि जड उचलणं, वाकणं या गोष्टी करणं टाळा.

  • ताप आला किंवा जास्त प्रमाणातील डिस्चार्ज यांसारख्या संसर्गाच्या लक्षणांकडे नीट लक्ष द्या.

  • शस्त्रक्रियेनंतर लगेच शक्य तितक्या लवकर स्तनपान देण्यास सुरु करा.

सी-सेक्शननंतर डिस्चार्ज मिळाल्यावर कशी काळजी घेतली पाहिजे?

  • हळूहळू काही प्रमाणात शारीरिक हालचाली वाढवा. परंतु वजन उचलणं किंवा व्यायाम करणं टाळा.

  • अधिक प्रमाणातील रक्तस्त्राव किंवा संसर्ग यासारख्या गुंतागुंतीच्या लक्षणांकडे बारकाईने पाहा.

  • बाळाची काळजी घेणं, बाळाचे लसीकरण करणं आणि बाळासाठी बालरोगतज्ञांचा सल्ला घ्या.

डॉ. राजपूत यांच्या सांगण्यांनुसार, सी सेक्शननंतर जवळपास ६ ते ८ महिने लैंगिक संबंध ठेवणं महिलांनी टाळलं पाहिजे. यावेळी महिलांनी स्वतःची काळजी, आराम, मानसिक आरोग्य यावर अधिक भर दिला पाहिजे. तसंच या काळात चांगला आहार आणि भरपूर प्रमाणात पाणी प्यायलं पाहिजे.

प्रसूतीनंतर जखमेची काळजी कशी घ्यावी?

  • टाके पडलेल्या ठिकाणची जागा स्वच्छ आणि कोरडी ठेवा

  • जखम साफ होईपर्यंत त्याला पाणी लागणार नाही याची काळजी घ्या

  • संसर्ग किंवा मोठी गुंतागुंत होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT