Neech Bhang Rajyog 2023 in Kark Saam tv
लाईफस्टाईल

Neech Bhang Rajyog 2023 in Kark: येत्या २० दिवसात या ३ राशींवर पडेल पैशांचा पाऊस, प्रगतीच्या अनेक नव्या संधी मिळतील

कोमल दामुद्रे

Mangal Kark Rashit Pravesh : ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ हा ग्रह अधिक पीडादायक समजला जातो. मंगळचा कर्क राशीत प्रवेश झाल्याने १ जुलै पर्यंत या राशींचे नशीब पालटणार आहे. मंगळचा कर्क राशीत प्रवेश झाल्याने धैर्य-शक्ती, जमीन, विवाह या गोष्टीवर शुभ-अशुभ प्रभाव पडेल.

मंगळाच्या राशी बदलामुळे नीचभंग राज योग तयार झाला आहे. याचा प्रभाव प्रत्येक राशीवर वेगवेगळ्या पद्धतीने पडेल. सामान्यतः कोणताही ग्रह जेव्हा दुर्बल राशीत असतो तेव्हा तो अशुभ फल देतो, परंतु यावेळी मंगळ कर्क राशीत असला तरीही काही राशींसाठी खूप शुभ फल देत आहे. एवढेच नाही तर ३१ जुलैपर्यंत या ३ राशींच्या आयुष्यात मंगळ संपत्ती (Money), प्रगती आणि सन्मान देईल.

या राशीच्या लोकांसाठी नीचभंग राजयोग शुभ असेल

1.मेष :

या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ मिळेल. पैशांच्या अनेक अडचणी सुरळीत होतील. घर-गाडी खरेदी करता येईल. नोकरीमध्ये (Job) तुम्हाला अशी संधी मिळू शकते, ज्याची तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत आहात. मालमत्ता आणि स्थावर मालमत्तेशी संबंधित लोकांसाठी हा काळ विशेषतः फायदेशीर आहे.

2. मिथुन:

हा नीचभंग राजयोग मिथुन राशीच्या लोकांना खूप लाभ देईल. या लोकांना नोकरीमध्ये नवीन संधी मिळू शकतात. या संधींचा तुम्ही चांगला फायदा (Benefits) घ्याल. अचानक कुठून तरी धनलाभ होईल. व्यावसायिकांनाही पैसे मिळू शकतात, अडकलेले पैसे मिळतील. वाणीच्या जोरावर काम होईल. मीडिया, मार्केटिंग, कला आणि व्यवसायाशी निगडित लोकांसाठी काळ विशेषतः शुभ राहील.

3. कन्या:

मंगळाच्या राशी बदलामुळे निर्माण झालेला नीचभंग राजयोग कन्या राशीच्या लोकांना लाभ देईल. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. अनेक स्त्रोतांकडून लाभ होईल. मानसन्मान मिळेल. जुन्या गुंतवणुकीतूनही फायदा होईल. पैसा कुठेतरी अडकला असेल तर सापडेल. व्यावसायिकांना मोठा फायदा होईल. नोकरदार लोकांना नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. बँक बॅलन्स वाढेल.

(टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Esha Gupta: ईशाच्या सौंदर्याचा जलवा; फोटोंवरुन नजर हटेना!

Beed News : नाथसागरातील पाण्यासाठी लोक लढा; बीडच्या १४० गावांचा सहभाग

Nitesh Rane Controversial Statement: नितेश राणेंवरून महायुतीत वाद, अजित पवार गटाने देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत केली मोठी मागणी

Thane Crime Story : एक खून, ना CCTV, ना ठोस पुरावे; अवघे दोन क्ल्यू अन् उकललं त्या हत्येचं गूढ

Nashik Crime : विहिरीत कासव पाहायला सांगितलं, नंतर ३ शाळकरी विद्यार्थ्यांना ढकलून दिलं; नाशिकमधील धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT