Monsoon Travel SAAM TV
लाईफस्टाईल

Monsoon Travel : ओले चिंब रस्ते अन् बहरलेला निसर्ग! पावसाळ्यात मुंबईजवळील 'हे' खास धबधबे फिरायला विसरू नका

Waterfall Near Mumbai : पावसाळ्यात मुंबईजवळ वन डे पिकनिकचा प्लान करत असाल तर, या भन्नाट लोकेशनला आवर्जून भेट द्या आणि निसर्गाच्या सानिध्यात निवांत वेळ घालवा.

Shreya Maskar

रोजच्या कामातून स्वतः साठी निवांत वेळ शोधत असाल तर वीकेंडसाठी बेस्ट ऑप्शन जाणून घ्या. येथे तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत, मित्रमंडळींसोबत फिरण्याचा प्लान करू शकता. येथे गेल्यावर तुमचा मूड फ्रेश होईल.

कुंडेश्वर धबधबा

कुंडेश्वर धबधबा बदलापूर येथे वसलेला आहे. या धबधब्याला प्राचीन वारसा लाभला आहे. तु्म्ही कुटुंबासोबत येथे वन डे पिकनिक प्लान करू शकता. पावसाळ्यात कुंडेश्वर धबधब्याचे सौंदर्य खुलून येते.

पळूचा धबधबा

जव्हार-विक्रमगड महामार्गावर पळूचा धबधबा आहे. हा धबधबा डोंगरी भागात आहे. येथे पावसाळ्यात पर्यटकांची गर्दी असते. येथे तुम्हाला वेगवेगळ्या जातीचे पक्षी पाहायला मिळतील. पावसाळ्यात उंचावरून कोसळणारा धबधबा पाहणे म्हणजे एक वेगळाच निसर्ग अनुभव होय.

जयसागर डॅम

जयसागर डॅम जव्हारमध्ये आहे. पावसाळ्यात येथील दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे असते. ठाणे जिल्ह्यात जव्हार येते. पावसाळ्यात दाट धुक्यात जव्हारचे सौंदर्य मनाला मोहून टाकते. जयसागर डॅम जव्हारला पाणी पुरवठा करतो.

पेल्हार डॅम

पावसाळ्यात भिजण्याची मजा लुटायची असल्यास पेल्हार डॅम बेस्ट ऑप्शन आहे. वसई, विरार दरम्यान पेल्हार गाव आहे. पावसाळ्यात पर्यटकांची येथे गर्दी होते.

बारवी डॅम

ठाणे जिल्ह्यातील बारवी डॅम पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात डॅम जवळचा परिसर हिरव्यागार निसर्गाने सजतो. हा परिसर फोटोशूटसाटी बेस्ट लोकेशन आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT