Krishna Janmashtami 2024 : श्रीकृष्णाच्या भक्तीत तल्लीन व्हा अन् 'या' इच्छापूर्ती मंदिरांना भेट द्या

Lord Shri Krishna Temple : यंदा श्रीकृष्ण जन्माष्टमीला कान्हाच्या प्रसिद्ध मंदिरांना भेट द्या आणि श्रीकृष्णच्या भक्तीत तल्लीन होऊन मनोभावे पूजा अर्चना करा.
Lord Shri Krishna Temple
Krishna Janmashtami 2024SAAM TV
Published On

यंदा कृष्ण जन्माष्टमी २६ ऑगस्ट २०२४ रोजी सर्वत्र जगभर साजरी केली जाणार आहे. कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. भगवान विष्णूचा अवतार म्हणून श्रीकृष्णाचा उल्लेख केला जातो. देशभर श्रीकृष्णाची प्रसिद्ध आणि इच्छापूर्ती मंदिर आहेत. जिथे देश विदेशातून भाविक श्रीकृष्णाचे आशीर्वाद घ्यायला येतात. येथे आल्यावर सुखाची प्राप्ती होते आणि मनशांती मिळते. चला तर मग आज भगवान श्रीकृष्णाच्या प्रसिद्ध मंदिरांविषयी जाणून घेऊयात.

श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर

उत्तर प्रदेशातील श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिरात भेट द्या आणि बाल गोपालचा आशीर्वाद घ्या. हे मंदिर मुथरा जिल्ह्यात आहे. याच ठिकाणी भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला, असे म्हणतात. त्यामुळे हे पवित्र स्थान मानले जाते. येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्यादिवशी मोठा उत्सव साजरा केला जातो.

इस्कॉन मंदिर

दिल्लीमधील इस्कॉन मंदिर हे श्रीकृष्णचे प्रख्यात मंदिर आहे. येथे दिवसरात्र श्रीकृष्णाची मनोभावे भक्ती केली जाते. या मंदिरात दिवसभर 'रहे राम हरे कृष्णा 'या महामंत्राचा जप सुरु असतो. इस्कॉन मंदिर हे वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे.

बांके बिहारी मंदिर

उत्तर प्रदेशमधील वृंदावन येथे बांके बिहारी मंदिर आहे. येथे भगवान श्रीकृष्णाची मनमोहक रुपाचे दर्शन घ्यायला मिळते. अनेक परदेशातूनही लोक येथे येतात.

भालका तीर्थ

गुजरात राज्यात सौराष्ट्रमध्ये भालका तीर्थ हे भगवान श्रीकृष्णाच्या प्रसिद्ध मंदिर आहे. भालका तीर्थमध्ये दर्शन घेतल्यास आपल्यातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मक दृष्टीकोन निमार्ण होतो. तसेच आपल्याला सर्व पापांमधून मुक्ती मिळते, असे ही भाविकांचे मत आहे.

Lord Shri Krishna Temple
Long Weekend Plan : लाँग वीकेंड येताच पिकनिकचे लागले वेध! मनसोक्त एन्जॉय करण्यासाठी 'हे' पावसाळी डेस्टिनेशन बेस्ट

द्वारकाधीश मंदिर

द्वारकाधीश मंदिर हे गुजरातमध्ये आहे. द्वारकाधीशाच्या रुपातील कृष्णाची पूजा या मंदिरात केली जाते. अनेक श्रीकृष्ण भक्त येथे येऊन कृष्णाच्या भक्तीत तल्लीन होतात.

उडुपी श्रीकृष्ण मठ

उडुपी श्रीकृष्ण मठ हे कर्नाटकमधील श्रीकृष्णाचं लोकप्रिय आणि इच्छापूर्ती मंदिर आहे. वर्षभर इथे भाविकांची मांदियाळी पाहायला मिळते.

Lord Shri Krishna Temple
Pune Travel : पुण्यात मान्सून ट्रेकिंगसाठी बेस्ट ऑप्शन, कमी खर्चात मजा होईल दुप्पट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com