Navratri Festival 2022 : सण-उत्सव आले की, प्रत्येकाला छान व सुंदर दिसायचे असते. हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यात कोणता ना कोणता सण (Festival) असतोच पण, आता अवघ्या काही दिवसात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे.
यंदा हा उत्सव २६ सप्टेंबर पासून सुरु होणार आहे. या उत्सवात जितके महिला (Women) वर्गांना आकर्षण असते तितकेच पुरुषांना देखील असते. या नऊ दिवसात नऊ विविध रंगांचे वस्त्र परिधान करण्यास मिळतात.
शारदीय नवरात्रीचे नऊही दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ मानले गेले आहेत. नवरात्रात केलेल्या देवी पूजनामुळे शक्ती, ज्ञान, आनंद, सुख, समृद्धी, समाधान, कीर्ती, मान, सन्मान, धन-वैभव प्राप्त होऊ शकते.
नवरात्री मधील दिवस आणि कोणत्या दिवशी कोणती माळ येते यावर प्रत्येक वर्षीच्या नवरात्रीमध्ये नऊ दिवसांचे नऊ रंग ठरतात. यंदा पांढर्या रंगापासून सुरूवात होईल तर पिंक अर्थात गुलाबी रंगाने सांगता होणार आहे.
नवरात्री २०२२ मधील नवरंग
प्रतिपदा पहिला दिवस - २६ सप्टेंबर - पांढरा
द्वितीया दुसरा दिवस - २७ सप्टेंबर- लाल
तृतीया तिसरा दिवस - २८ सप्टेंबर - रॉयल ब्लू
चतुर्थी चौथा दिवस - २९ सप्टेंबर - पिवळा
पंचमी पाचवा दिवस - ३० सप्टेंबर - हिरवा
षष्ठी सहावा दिवस - ०१ ऑक्टोबर - राखाडी
सप्तमी सातवा दिवस - ०२ ऑक्टोबर - नारंगी
अष्टमी आठवा दिवस - ०३ ऑक्टोबर - गुलाबी
नवमी नववा दिवस - ०४ ऑक्टोबर - जांभळा
तुमच्या वॉर्डरोबमध्ये या रंगाचे कपडे आहे का ? ते आजच पहा आणि लगेच खरेदी करा .
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.