navratri color saam tv
लाईफस्टाईल

Navratri 2024: नवरात्रीत देवीची पाचवी माळ; जाणून घ्या पांढऱ्या रंगाचे महत्व

navratri color 2024: हिंदू धर्मातील नवरात्री सणाचा आज पाचवा दिवस आहे. या दिवशी देवी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात.

Saam Tv

नवरात्र म्हणजे 'नऊ रात्र' असा संस्कृतमध्ये अर्थ आहे. हिंदू धर्मात 'नवरात्र' हा सण मोठ्या धामधुमीत साजरा केला जातो. प्रत्येक दिवशी देवीला नऊ वेगवेगळ्या रंगाची साडी नेसवली जाते. आज चा शुभ रंग हा पांढरा आहे. आज नवरात्रीचा पाचवा दिवस सुरु आहे. या दिवशी देवी 'स्कंदमातेचे' पूजन केले जाते. या दिवशी स्कंदमातेची शिकवण दिली जाते.

देवी स्कंदमाता

'देवी स्कंदमाता' ही कार्तिकेय स्वामींच्या नावाने सुद्धा ओळखली जाते. ही देवी कार्तिकेयची माता आहे. या कारणाने पार्वतीला सुद्धा स्कंद माता म्हंटले जाते. यात देवीला लाल-पिवळी वस्त्रे परिधान केली जातात. देवी ही गोऱ्या वर्णाची असते म्हणून पांढरे , लाल- पिवळे रंगाचे वस्त्र पाचव्या दिवशी वापरले जातात.

पाचव्या दिवशी काय आवर्जून करावे?

सर्वप्रथम श्री गणेश पुजनानंतर त्वरित देवी पुजन करावे. पुजेमध्ये तुम्ही पाणी, दुध, चंदन, तांदुळ, फुलं, कुंकू, हळद या साहित्याचा वापर करावा. आपल्या आरतीच्या ताटात तुपाचा दिवा लावावा. पाचव्या दिवशी देवीला केळी आणि मिठाईचा नैवेद्य अर्पण करावा.

पांढऱ्या रंगाचे महत्व

स्कंदमाता देवीला समर्पित, पांढरा रंग पवित्रता आणि शांततेचे प्रतीक आहे. पांढरा रंग शांतता निर्माण करतो. तसेच देवीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पांढरा रंग वापरला जातो. या दिवशी, भगवान कार्तिकेयची माता स्कंदमाता हिचा सन्मान केला जातो. ती मातृप्रेम, पालनपोषण आणि शांतता दर्शवते. पांढरा परिधान केल्याने शांतता आणि आध्यात्मिक शुद्धता येते.

Edited By : Sakshi Jadhav

Maharashtra Live News Update: सोलापुरात नोकरी न मिळाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

Sushil Kedia: मराठी भाषेवरून व्यावसायिकानं राज ठाकरेंना डिवचलं; ५ तारखेनंतर करेक्ट कार्यक्रम करणार, मनसे नेत्याचं प्रत्युत्तर

Ind vs Eng : बेन स्टोक्ससोबत भरमैदानात बाचाबाची; रविंद्र जडेजानं सांगितलं नेमकं कारण

Ashadhi Ekadashi Upvas: आषाढी एकादशीला जास्त मेहनत न घेता घरीच बनवा हे ६ सोपे पदार्थ

Hruta Durgule : महाराष्ट्राची क्रश हृता दुर्गुळे सध्या काय करते ?

SCROLL FOR NEXT